आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय आहे कॅल्सिफिकेशन शोल्डर? या आजारामुळे  अनिल कपूरला होतोय त्रास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

62 वर्षीय चित्रपट अभिनेता अनिल कपूर कॅल्सिफिकेशन ऑफ शोल्डर नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, मागील दोन वर्षांपासून त्याच्या उजव्या खांद्यामध्ये कॅल्शियम जमा होत असून खांदे कडक झाले आहेत. तो लवकरच उपचारासाठी जर्मनीला जाणार आहे. जाणून घेऊया कॅल्सिफिकेशन ऑफ शोल्डर म्हणजे नेमके काय.... 


शरीरातील कोणत्याही भागात जमू लागते कॅल्शियम 
कॅल्सिफिकेशनची अवस्था शरीरात त्या वेळी होतेे ज्या वेळी शरीरातील टिश्यू, शिरा किंवा शरीरातील कोणत्याही भागात कॅल्शियम जमू लागते. संपूर्ण शरीरात कॅल्शियमचा पुरवठा रक्ताच्या माध्यमातून होतो. हा प्रत्येक पेशीमध्ये पसरत असतो म्हणून शरीराच्या कोणत्याही भागात कॅल्शियम जमा होऊ शकते. अशा वेळी ज्या जागेवर परिणाम झाला असेल ती जागा कडक होऊ लागते आणि हालचाल करण्यास त्रास होतो. 


- नॅशनल अॅकॅडमी ऑफ मेिडसिननुसार ९९ टक्के कॅल्शियम दात आणि हाडांमध्ये, तर १ टक्का रक्त, मांसपेशी आणि पेशींमध्ये आणि िटश्यूमध्ये असते. शरीरात कित्येक विकृती असतात, ज्यामुळे हळूहळू एका विशिष्ट भागात कॅल्शियम जमा होत असते. पुढे ते कॅल्सिफिकेशनचे कारण होते. 


- कॅल्शियम शरीरातील कोणत्याही भागात जमा होऊ शकते. जसे लहान लहान धमण्या, हार्ट व्हॉल्व्ह, मेंदू, सांधे, छाती, मांसपेशी, किडनी आणि मूत्राशय. कॅलिफोर्नियाच्या स्कूल ऑफ मेडिसिननुसार, सर्वच बाबतीत कॅल्शियम जमा होणे धोकादायक नसते- जसे सूज आणि दुखापत. तेच धमण्या आणि अवयवांमध्ये असे होणे गंभीर बाब आहे. 


- कॅल्शिफिकेशनची कित्येक कारणे असू शकतात. जसे संक्रमण, कॅल्शियम मेटाबॉलिझम डिसऑर्डर म्हणजे हायपरकॅल्शिमिया आणि ऑटोइम्युन डिसऑर्डर होय. या आजारामुळे शरीराच्या प्रणालीला आणि हाडांना जोडणाऱ्या पेशींवर परिणाम होतो. 


- हार्वर्ड युनिव्हर्सिटीनुसार, कॅल्शियमचे प्रमाण जास्त असलेला आहार घेतल्यामुळे असे होते असा जास्तीत जास्त लोकांचा हा भ्रम आहे. परंतु अशा वेळी मुतखडा होण्याची शक्यता असते. शरीरातून कॅल्शियम ऑक्झलेट बाहेर न पडल्यामुळे स्टोन होऊ शकतो. 


- रक्त तपासणी आणि एक्स-रेच्या मदतीने हे समजू शकते. उपचारासाठी सूज कमी करण्याची औषधी आणि आइस थेरपी केली जाते. कॅल्शियममुळे जास्त नुकसान झाल्यास सर्जरी करावी लागते. 

बातम्या आणखी आहेत...