आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅलिफोर्नियात 3 वर्षांत सर्वात मोठी आग, 2.30 लाख एकरांत पसरली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 वॉशिंग्टन  - कॅलिफोर्निया जंगलात लागलेली आग २.३० लाख एकरात पसरली आहे. आगीचा प्रभाव कमीत कमी १० शहरांवर पडला आहे. यामुळे सुमारे ६ लाख लोक बेघर झाले आहेत. अमेरिकेच्या नॅशनल अकादमी आॅफ सायन्सने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे कॅलिफोर्नियाच्या जंगलाचे तापमान आणि दुष्काळ वाढला. यामुळे आग पसरत गेली. मागील एका आठवड्यात २३० पेक्षा जास्त ठिकाणी आग लागली. या अागीचे नाव मारिया फायर ठेवले आहे. याचा जास्त प्रभाव दक्षिण कॅलिफोर्नियावर पडला आहे.  आग १२ दिवसांपूर्वी लागली होती. ज्या भागातील आग विझवली जात आहे त्या भागातील लोकांना परत जाण्यास परवानगी मिळत आहे. मात्र, हजारो घरे नष्ट झाली आहेत. ही आग कॅलिफोर्नियात गेल्या दोन वर्षात लागलेल्या आगींपेक्षा मोठी आहे. मात्र, जीवितहानी झाली नाही. २०१७ मध्ये १.३ लाख व २०१८ मध्ये १.९ लाख एकरात आग लागली होती. सन २०१८ मध्ये ८६ लोकांचा मृत्यू झाला होता. 

कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरांवर ट्रम्प बरसले, म्हणाले- निधीत कपात करू
- राष्ट्रपती ट्रम्प यांनी ट्विट करत सांगितले की, केंद्र सरकार या वर्षीही कॅलिफोर्नियाच्या निधीत कपात करेल. कॅलिफोर्नियाचे डेमोक्रॅट गव्हर्नर गॅव्हिन न्यूसॉम यांनी आग विझवण्यासाठी खराब व्यवस्थापन केले. यामुळे जंगल नसलेला भागही नष्ट झाला.

- कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन यांनी ट्रम्प यांच्या ट्विटला लगेच उत्तर दिले.  त्यांनी सांगितले की, राष्ट्रपती ट्रम्प यांचे पर्यावरणाचे धोरण गहन आहे. ट्रम्प वातावरण बदलावरही विश्वास ठेवत नाहीत. यामुळे ते आग लागण्याचे कारण कसे समजू शकतील?

- कॅलिफोर्नियाच्या जंगलाच्या ५७% भागाचे व्यवस्थापन केंद्र सरकारच्या संस्था करतात. यासाठी केंद्र कॅलिफोर्नियाला निधी देते. गेल्या वर्षी कॅलिफोर्नियाला यासाठी ५११ कोटी रुपये देण्यात येणार होते. मात्र, ट्रम्प सरकारने यातील ६४ कोटी रुपये कपात केले.

बातम्या आणखी आहेत...