आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा भारत बंद: राहुल म्हणाले सर्व विरोधक एकत्र, पवार, मनमोहन यांचाही सरकारवर हल्लाबोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांच्या विरोधात काँग्रेससह विरोधकांनी भारत बंद पुकारला आहे. बिहार, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात या बंदचा परिणाम पाहायला मिळतोय. मुंबईत काँग्रेस नेते संजय निरुपम यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांबरोबर वाद घातल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सर्वपक्षीय बड्या नेत्यांसह रामलीला मैदानावर विरोध प्रदर्शन करत आहेत. राहुल गांधींबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि लोजद प्रमुख शरद यादव, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही रामलीला मैदानावर उपस्थिती आहे. 

 

Congress President @RahulGandhi addresses the gathering at the #BharatBandh protests. #MehangiPadiModiSarkar https://t.co/9rqJlrBFAN

— Congress (@INCIndia) September 10, 2018

 

कोण काय म्हणाले..

मनमोहन सिंग - रामलीला मैदानावर बोलताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले, मोदी सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत. त्याचा परिणाम देशाला भोगावा लागतोय. आता फार काळ हे सरकार टिकू शकणार नाही.  

 

#BharatBandh UPDATES 

- बिहारमध्ये आंदोलकांनी एका अॅम्ब्युलन्सला वाट न दिल्यामुले एका चिमुरडीचा प्राण गमवावा लागला

- गुजरातच्या भारुचमध्ये महामार्गावर टायर जाळून वाहतूक अडवण्यात आली आहे. 

- बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलक रस्त्यावर उतरून सरकारविरोधी घोषणा देत आहेत. 

- मध्यप्रदेशच्या उज्जैनमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर तोडफोड केली. 

 

राजघाटावर अर्पण केले कैलास पर्वतावरील जल 
राहुल गांधींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करून आंदोलनाची सुरुवात केली. यावेळी राहुल गांधींनी राजघाटावर त्यांच्या कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान त्यांनी आणलेले पवित्र जल अर्पण केले. त्यानंतर त्यांनी रामलीला मैदानाच्या दिशेने मार्च काढला आणि ते आंदोलनासाठी पोहोचले. 

Congress President @RahulGandhi offers waters from the holy Mansarovar lake from his #KailashYatra at the samadhi of Mahatma Gandhi at #Rajghat pic.twitter.com/qTrVtZCwIc

— Congress (@INCIndia) September 10, 2018

 

बातम्या आणखी आहेत...