Home | International | Other Country | Cambodia's annual fishing festival in Cambodia

कंबोडियात वार्षिक मासेमारीच्या उत्सवात मासे पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड 

वृत्तसंस्था | Update - Feb 11, 2019, 09:54 AM IST

मासेमारीच्या या उत्सवात केवळ पारंपरिक पद्धतीचाच वापर केला जातो. 

  • Cambodia's annual fishing festival in Cambodia

    नामपेन्ह- कंबोडियामध्ये वार्षिक मासेमारीचा उत्सव साजरा केला जात आहे. कंबोडियाच्या टबोंग खमूम राज्यातील चोम क्रोव्हेन कम्युनमध्ये आयोजित मासेमारी उत्सवात नागरिकांची मासे पकडण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. पूर्व कंबोडियातील या चिखलयुक्त सरोवरात शेकडो लोक बांबूची बास्केट, जाळे घेऊन आले होते. मासेमारीच्या या उत्सवात केवळ पारंपरिक पद्धतीचाच वापर केला जातो.

    मासेमारीची ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी कापणीच्या हंगामानंतर हा उत्सव साजरा केला जातो. नामपेन्हपासून २५० किमी अंतरावर चोम क्रोव्हेन कम्युनमध्ये दरवर्षी हा उत्सव साजरा होतो. यात सहभागी होण्यासाठी शेजारच्या गावातील शेकडो लोक येतात.

    ४० % लोकांची उपजीविका मासेमारीवर आहे.
    रविवारच्या मासेमारी उत्सवात पुरेसे मासे मिळावेत तसेच बेकायदा मासेमारी होऊ नये यासाठी महिनाभरापासून क्रोएम सरोवरात सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाते.

Trending