आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतात उंट चरण्यासाठी आला म्हणून वाद, कुऱ्हाडीचे वार करुन केले ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनपेठ तालुक्यातील घटना

परभणी- चरण्यासाठी गायरानात आलेल्या उंटावर कुऱ्हाडीचे घाव घालत त्याला ठार मारल्या प्रकरणी दोघा जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


माळेगाव(जि.नांदेड) येथील यात्रेसाठी घनसावंगी येथील गुलाब सुंदर सय्यद हे आपला उंट घेवून जात होते. ते सोनपेठ तालुक्यातील शेळगाव जवळील हारसिंग तांडा येथून जात असताना तेथील गायरानात उंट चारण्यासाठी नेला. तेथील कांचन भोसले व पप्पू शिंदे यांनी उंटाला गायरानात चारण्यासाठी का आणले या कारणावरून त्याच्यावर कुऱ्हाडीचे घाव घातले. या मारहाणीत उंट जबर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.


घटना घडताच कांचन भोसले व पप्पू शिंदे हे दोघेही फरार झाले. याप्रकरणी गुलाब सुंदर सय्यद यांनी सोनपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...