आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीराला योग्य आकार देण्यात लाभदायक आहे Camel Pose

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिट राहण्यासाठी वजन कमी करणेच पुरेसे नाही, तर शरीराला योग्य आकार देणेही आवश्यक आहे. अनेकदा नियमित व्यायामानंतरही शरीराचा आकार योग्य राहत नाही. कारण नेहमी व्यायामामध्ये लोक वजन कमी करणाऱ्या व्यायाम प्रकारांचा समावेश करतात. मात्र, शरीराला योग्य आकार देणाऱ्या योगासनांचा व्यायामात समावेश करण्यास विसरतात. कॅमल पोझ असेच एक योगासन आहे. ते नियमित केल्याने शरीर लवचिक होते आणि त्याला योग्य आकारही मिळतो. या आसनाला उष्ट्रासन असेही म्हणतात. 


असे करा 
हे करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही जमिनीवर गुडघ्यांच्या आधारे किंवा वज्रासनामध्ये बसा. बसताना जांघा आणि पाय एकत्र असावेत, पंजे मागच्या बाजूने जमिनीवर टेकवा. गुडघे व पायांमध्ये सुमारे एक फुटाचे अंतर ठेवा. आता गुडघ्यांवर उभे राहा. श्वास घेत मागच्या दिशेने झुका आणि आता उजवा हात उजव्या टाचेवर तसेच डावा हात डाव्या टाचेवर ठेवा. मागे वाकताना मानेला झटका लागू देऊ नका. शेवटच्या मुद्रेत मांड्यांचा जमिनीपासून समकोन बनवा आणि डोके मागच्या दिशेने वाकवा. शरीराचे वजन बाहूंवर आणि पायांवर समानरीत्या असले पाहिजे. आता हळूहळू श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. क्षमतेनुसार या मुद्रेत राहा. मग पुन्हा दीर्घ श्वास सोडत सामान्य स्थितीत परत या. ही क्रिया ५ ते ७ वेळा करणे फायदेशीर ठरते. 


कॅमल पोझचे फायदे 
- हे आसन योग्य पद्धतीने केल्यास यामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी वेगाने कमी होते. 
- शरीराला लवचिक बनवणे आणि कंबरदुखी दूर करण्यामध्ये हे आसन खूप फायद्याचे आहे. 
- छोटी छाती रुंद करण्यासाठीही हे करता येईल. 
- महिलांसाठी हे आसन विशेष फायद्याचे आहे. यामुळे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी होतात. 
- पाठीचा कणा सरळ आणि लवचिक बनवण्यामध्येही हे आसन फायदेशीर आहे. 
- पचनशक्ती वाढवणे आणि चेहरा उजळ करण्यासाठीही हे आसन करता येऊ शकते. 


सावधगिरी गरजेची 
- उच्च किंवा कमी रक्तदाब असेल तर हे आसन करू नये 
- पाठीचा मणका दुखत असेल किंवा लचक असेल तर हे आसन करू नये. 
- गर्भावस्था, हृदयरोग आणि मायग्रेनची समस्या असेल तरीदेखील हे आसन करणे टाळा. 

बातम्या आणखी आहेत...