Home | Business | Industries | camelin-kukoya tie-up

कॅम्लिनचा संसार यापुढे कोकुयोबरोबर

agency | Update - May 31, 2011, 04:31 PM IST

कॅम्लिन लिमिटेड कंपनीने आपला विस्तार वाढविण्यासाठी कंपनीमधील ५०.३. टक्के भांडवली हिस्सा कोकुयो या जपानी कंपनीला विकला आहे. ३६६ कोटी रुपयाला हा हिस्सा विकला आहे.

  • camelin-kukoya tie-up

    camlin_300कॅम्लिन लिमिटेड कंपनीने आपला विस्तार वाढविण्यासाठी कंपनीमधील ५०.३. टक्के भांडवली हिस्सा कोकुयो या जपानी कंपनीला विकला आहे. ३६६ कोटी रुपयाला हा हिस्सा विकला आहे.

    त्यामुळे कॅम्लिनच्या सध्याच्या उत्पादनांचा विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी ज्वाइंट व्हेंचर स्थापन करण्याचा दोन्ही कंपन्यांनी निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया तीन टप्प्यामध्ये करण्यात येईल.

    कोकुयो कंपनीद्वारे कॅम्लिनचे व्यवस्थापन, विपणन, निर्मिती तसेच उत्पादनातील संशोधन आणि विकास या क्षेत्राकडे लक्ष पुरविण्यात येणार आहे. कोकुयो ही जपानमधली स्टेशनरी आणि फर्निचर क्षेत्रातली आघाडीची कंपनी आहे. कॅम्लिन लिमिटेडचे संस्थापक असलेल्या दांडेकर कुटुंबाकडे कंपनीचे १३.३ टक्के समभाग राहणार आहे.Trending