आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Campaign | 11 Year Old Girl Started Startup To Get Rid Of Children's Mobile Addiction

लहान मुलांना मोबाईलच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी 11 वर्षाच्या चिमुकलीने सुरु केले स्टार्टअप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
भाविकाने आतापर्यंत 12 सेमिनार केले आहेत. - Divya Marathi
भाविकाने आतापर्यंत 12 सेमिनार केले आहेत.
  • भाविकाने एक ड्राइंग बुक तयार केली, याद्वारे ती सांगते की, मोबाइलचा केव्हा आणि किती वापर करायला हवा
  • भाविका माहेश्वरीने समवयस्क मुलांना मोबाइलच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी मोहिम सुरू केली आहे

सूरत - गुजरातच्या सुरतमधील एका 11 वर्षीय भाविका माहेश्वरीने समवयस्क मुलांना मोबाइलच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी मोहिम सुरू केली आहे. यासाठी तिने मोबाइल अॅडिक्शन क्लिनिक नावाने स्वतःचे स्टार्टअप सुरु केले आहे.
भाविकाने या स्टार्टअपद्वारे 24 पानांचे एक ड्राइंग बुक तयार केले आहे. हे ड्राइंग मोबाइलचा केव्हा, किती आणि कशाप्रकारे उपयोग करावा याबाबत माहिती देते. भाविकाने आपल्या स्टार्ट-अपची वाणिज्य मंत्रालयात नोंदणी देखील केली आहे. भाविकाने सांगितले की, मी 12 शाळांमध्ये याबाबत सेमिनार केले आहेत. या दरम्यान मला जाणवले की, जागृकतेसाठी सेमिनावर व्यतिरिक्त आणखी वेगळे काही करण्याची गरज आहे. माझ्या मते, ड्राइंग बुकद्वारे हा संदेश चांगल्या प्रकारे पोहोचवला जाऊ शकतो. सध्या हे पुस्तक शाळेत पाठवण्याची तयारी सुरु आहे.