आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममतांना ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्रे पाठवण्याचे अभियान सुरू; अयाेध्येतील विविध संत-महंतांच्या संघटनांनी घेतला पुढाकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयाेध्या - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्रे पाठवण्याची माेहीम मर्यादा पुरुषाेत्तम भगवान श्रीरामनगरी अयाेध्येपासून गुरुवारपासून सुरू करण्यात आली. 


श्रीराम जन्मभूमी न्यासचे ज्येष्ठ सदस्य व वशिष्ठ भवन हिंदू धामचे महंत आणि माजी खासदार डाॅ.रामविलास दास वेदांती, आचार्य पीठ तपस्वी छावणीचे महंत स्वामी परमहंस यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, रावण, माेगल यासारखे माेठमाेठे राजे भगवान श्रीरामांना मिटवू शकले नाहीत; मग ममता का मिटवू शकतील? प.बंगालमध्ये हिंदू देवी-देवतांचे नाव घेण्यास बंदी लादली जात असून, असे करणाऱ्यांना तेथील सरकार कारागृहात डांबत आहे. हा प्रकार अयाेग्य असून, यास आम्ही विराेध करू. ममतांना याची आगामी विधानसभा निवडणुकीत किंमत माेजावी लागेल. त्यामुळेच या अभियानांतर्गत ‘जय श्रीराम’ लिहिलेले एक लाख पाेस्टकार्ड ममता बॅनर्जींना पाठवले जातील. यासाठी न्यासचे अध्यक्ष नृत्यगाेपालदास यांच्या अध्यक्षतेखाली बैठक हाेऊन त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.
 

वाराणसीच्या महंतांनी पाठवले श्रीरामचरितमानस 
या अभियानांतर्गत वाराणसीच्या महंतांनीही ममता बॅनर्जींच्या राज्यातील धाेरणास विराेध करून त्यांना श्रीरामचरितमानस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हा महान ग्रंथ वाचून ममतांची बुद्धी शुद्ध हाेईल. कारण भगवान श्रीरामांचे नाव घेण्यास विराेध दर्शवून त्या संकुचितवृत्तीचे दर्शन घडवत आहेत. याच कारणामुळे एके दिवशी त्यांचे पतन हाेईल. असे हाेऊ नये म्हणून आम्ही त्यांना श्रीरामचरितमानसची एक प्रत पाठवण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना ते पुस्तक वाचण्याचे आवाहन केले जाणार आहे. तसेच या ग्रंथासह भारतीय संस्कृतीतील अनेक शास्त्रे समजून घेण्यासही आम्ही त्यांना मदत करू, अशी माहिती महंतांकडून देण्यात आली. दरम्यान, भाजपने ममता बॅनर्जींना ‘जय श्रीराम’ लिहिलेले १० लाख पाेस्टकार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भाजपच्या या अभियानास संत-महंतांच्या विविध संघटनाही सहकार्य करत आहेत.