Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | can bats see during daytime know reality

वटवाघुळे दिवसादेखील पाहू शकतात? जाणून घ्या वास्तव

रिलिजन डेस्क | Update - Jan 23, 2019, 12:58 PM IST

पक्षी शास्त्रज्ञांच्या मते, वटवाघूळ आंधळे नसतात. त्यांचे लहान आकाराचे डोळे अत्यंत शक्तिशाली असतात.

  • can bats see during daytime know reality

    वाटवाघळांना दिवसा दिसत नाही त्यामुळे ते रात्री घरातून बाहेर पडतात, असा सर्वसाधारण समज आहे. पण हे खरे नाही. वाटवाघूळ दिवसाही पाहू शकते. कमी प्रकाशातही अधिक स्पष्ट पाहण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. पक्षी शास्त्रज्ञांच्या मते, वटवाघूळ आंधळे नसतात. त्यांचे लहान आकाराचे डोळे अत्यंत शक्तिशाली असतात. रात्री उडताना ते ध्वनी संचरण पद्धतीचा वापर करतात. म्हणजेच त्यांच्या शरीरातून निघणाऱ्या लहरी या ई-लहरींपेक्षा 2000 पटींनी अधिक शक्तिशाली असतात. या पक्ष्यांमध्ये गंध घेणे आणि ऐकण्याची क्षमताही जबरदस्त असते. त्यांची स्वत:ची अशी रडार प्रणाली असते. उडताना हे कर्कश आवाजात ओरडतात. हा ध्वनी मानवी क्षमतेच्या कैक पटींनी जास्त आहे.


    हा आवाज हवेत लहरी निर्माण करतो. या लहरी एखाद्या वस्तूवर आदळून त्यांच्यापर्यंत परततात. अशा प्रकारे ते पुढील रस्त्याचा, अडथळ्यांचा किंवा शिकारीचा अंदाज लावतात. एखाद्या वटवाघळाच्या डोळ्यावर पट्टी बांधली तरी ते शिकार करून सुरक्षितरीत्या परत येईल. मेक्सिको शास्त्रज्ञांनी जगभरातील वटवाघळांवर संशोधन केले. त्यानुसार, त्यांचे पाय फार मजबूत नसतात. त्यामुळे जमिनीवरून पळत उड्डाण करू शकत नाहीत. त्यामुळे ते झाडे, गुहांमध्ये लटकत असतात, जेणेकरून तेथून सहज उड्डाण करू शकतील. इतर प्राणी-पक्ष्यांपासून बचाव करण्यासाठी ते दिवसाच्या जास्त प्रकाशात फार बाहेर पडत नाहीत. (source : Abbc.com, sciencetry.org, srbscience.in)

Trending