आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकलेचे अनेक प्रकार असतात. यात मुर्ती बनवण्यापासून ते पेंटिंग करण्यापर्यंतच्या कलेचा समावेश आहे. काही लोक आपल्या कलेत एवढे पारंगत असतात की, त्यांची कला समजून घेण्यासाठी लोकांना बुद्धीला तान द्यावा लागतो. पण, जेव्हा ती कला लक्षात येते, तेव्हा प्रशंसा करताना थकत नाही. असेच एक कलाकार आहेत ऑस्ट्रिया येथील जोहानस स्टोटर. जोहानसने आपल्या कामात परफेक्शन आणण्यासाठी अनेक वर्ष मेहनत घेतली.
कामातून झाले प्रसिद्ध
जोहानसची कला पाहून प्रत्येकजण हैरान होतो. पेशाने ते पेंटर आहे, पण सध्या ते आपल्या एका वेगळ्या आर्टवर्कमुळे चर्चेचा विषय बनले आहेत. जोहानस काही वस्तूंमध्ये नग्न मॉडेल्सना अशा प्रकारे लपवतात की त्यांना एका नजरेत शोधने अवघड असते.
आता या वरिल फोटोकडेच पाहा, इंटरनेटवर व्हायरल हा फोटो पहिल्यावर वाटते की, काही रंगबेरंगी दगडांना एका जागेवर गोळा केले आहे. पण या दगडांसोबत एका नग्न मॉडेलचाही फोटो आहे असे जर तुम्हाला सांगितले तर.... विश्वास बसणार नाही. होय, या कलेमध्ये जोहानस तासंतास मेहनत घेऊन मॉडेल्सना पेंट करतात आणि त्यानंतर समोर येणारी कलाकृती लोकांना आश्चर्यचकीत करून टाकते. तुम्हाला दिसतोय काय या फोटोत दडलेला न्यूड मॉडल?
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, जोहानस यांच्या आणखी काही कलाकृती...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.