आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेहरान- तेहरान विमानतळावरुन उड्डाण भरताच अवघ्या काही मिनीटात क्रॅश झालेल्या विमानाच्या अपघातात आता नवीन खुलासा समोर आला आहे. हे विमान काही तांत्रिक अडचणीमुळे कोसळले नसून, याला इराणने फायर केलेल्या दोन मिसाइलने पाडले असल्याचा दावा कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी केला आहे. यासोबतच एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे, ज्यात यूक्रेनच्या विमानावर मिसाइल लागल्यानंतर त्याचा स्फोट झालेला दिसत आहे. विमान बोइंग 737-800 च्या अपघातात 176 जण मृत्यू झाला होता. या विमानात 63 कॅनेडीयन, 82 यूक्रेनी, 10 स्विडीश आणि जर्मनी-ब्रिटेनचे 3-3 नागरिकांचाय समावेशळ होता.
व्हिडिओत काय दिसत आहे ?
व्हिडिओत दिसत आहे की, परांडाच्या आकाशात विमानावर मिसाइल आदळताच विमानात अचानक आग लागली. बीबीसीने खुलासा केला होती, उड्डाण भरताच विमानाचा विमानतळाशी संपर्क तुटला होता. त्यानंतर विमानाने परत येण्याचा प्रयत्न केला. पण, काही वेळातच विमानात स्पोट होऊन क्रॅश झाले. पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय रिसर्च एजंसी बेलिंगकॅटने जियोलोकेशन तंत्रज्ञानाच्या मदतीने हे माहिती काढली की, हा व्हिडिओ परांडाच्या एका घरातून शूट झाला आहे.
प्रवासी विमानावर 47 वर्षात 6 वेळा मिसाइल हल्ले
कुठे | तारीख | काय झाले? | किती जण मारले गेले? |
यूक्रेन | 17 जुलै 2014 | रशिया समर्थित विद्रोहिंनी मलेशियाच्या विमानावर हल्ला केला होता | 298 |
सोमालिया | 23 मार्च 2007 | मोगदिशुमध्ये बेलारूस एअरलाइनच्या विमानावर रॉकेट हल्ला | 11 |
ब्लैक सी | 4 ऑक्टोबर 2001 | यूक्रेनमध्ये रशियाच्या विमानावर चुकीने मिसाइल हल्ला झाला होता | 79 |
इराण | 3 जुलै 1988 | अमेरिकी वॉरशिपमधून इराण एअरलाइनच्या विमानावर हल्ला झाला | 290 |
रशिया | 1 सप्टेंबर 1983 | रशियन फायटर जेट्सने दक्षिण कोरियाच्या बोइंग-747 ला पाडले होते | 269 |
इजिप्त | 21 फेब्रुवारी 1973 | इस्राइल फायटर जेट्सने लीबियाच्या विमानावर हल्ला | 112 |
कॅनेडीयन नागरिकांना उत्तर मिळणे गरजेचे- ट्रूडो
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सांगितले की, यूक्रेन एअरलाइनचे विमान तेहरानवरुन टेकऑफ करताच जमिनीवरुन हवेत मारणाऱ्या एका मिसाइलच्या संपर्कात आले. माध्यमांशी बोलताना ट्रूडो म्हणाले की, असे असू शकते की, हे मुद्दामुन केले नाही. पण, कॅनेडाच्या नागरिकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळणे गरजेचे आहे.
दुसरीकडे ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसनदेखील म्हणाले की, यूक्रेन एअरलाइनचे विमान इराणच्या एका सर्फेस-टू-एअर मिसाइल लागल्याने पडले आहे. तेदेखील म्हणाले की, हे चुकीने पडले असू शकते. पण, याचा तपास करणे गरजेचे आहे. तसेच, त्यांनी पश्चिमी आशियातील देशांना शांतचेचे आवाहन केले आहे.
मिसाइल हल्ल्याची माहिती बिनबुडाची
कॅनडा आणि ब्रिटेनच्या मिसाइल हल्ला झाल्ल्याच्या दाव्याव काहीत तथ्य नसल्याचे इराणच्या प्रशासनानेच म्हणने आहे. इराणचे म्हणने आहे की, हा इराणविरोधात युद्ध सुरू करण्यासाठी आखलेला डाव आहे. ज्या कोणत्या देशाचे नागरिक क्रॅशमध्ये मारले गेले आहेत, त्या देशाने आपला प्रतिनिधी पाठवून तपास करावा. आम्ही बोईंगला ब्लॅक बॉक्स तपासण्याची परवानगी देतोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.