Court decision / कॅनडा : घर खरेदी करून रिकामे ठेवल्याने १.४ काेटी रुपयांचा दंड; अब्जाधीशाच्या पत्नीने १४३ काेटींना घर खरेदी केले

नाेटिशीच्या विराेधात काेलंबिया सर्वाेच्च न्यायालयात याचिका 
 

दिव्य मराठी

Jul 11,2019 10:52:00 AM IST

व्हँकुव्हर - कॅनडामध्ये एक अजब घटना घडली आहे. व्हँकुव्हर प्रशासनाने चीन अब्जोपतीची पत्नीवर घर खरेदी केल्यानंतर तेथे न राहिल्याबद्दल १.४ काेटी रुपयांचा दंड ठाेठावला आहे. या महिलेने १४३ काेटी रुपये किमतीचे घर खरेदी केले हाेते. पण ते नेहमी रिकामे राहायचे. वास्तविक व्हँकुव्हर प्रशासनाने २०१८मध्ये रिकाम्या घरांवर कर लागू केला हाेता. त्यानुसार रिकाम्या घरांवर एकूण घर खरेदी रकमेच्या एक टक्के दंड म्हणून भरावी लागते. हे यिजु यांनी २०१५ मध्ये बेलामाेंट एव्हेन्यू भागात समुद्र दर्शन हाेणारे घर खरेदी केले हाेते. त्यांचे पती जेन झियांग चीनच्या पिपल्स नॅशनल कांॅग्रेसमध्ये नेते आहेत. फाेर्ब्सच्या नुसार या दांपत्याची एकूण मालमत्ता ६,४७५ काेटी रु. आहे. यिजुने नाेटिसीच्या विराेधात ब्रिटिश काेलंबिया सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली. घर रिकामे असले तरी त्यात नूतनीकरणाची कामे सुरू असतात असे तिने याचिकेत म्हटले आहे.

X