आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Canadian Couple Were Climbing Mount Bromo Volcano And Proposes To His Girlfriend

सक्रिय ज्वालामुखीवर जाऊन आपल्या मैत्रीणीला घातली लग्नाची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओटावा(कॅनडा)- ज्वालामुखीवर चढणे कोणत्याही व्यक्तीसाठी अत्यंत रोमांचकारी अनुभव असतो. तो रोमांच अनुभवण्यासाठी कॅनडाचा रहिवासी असलेला जॅरड आपल्या मैत्रीणीसोबत येथे आला होता. येथे आल्यावर त्याने केलेल्या एका युक्तीने त्याच्या मैत्रीणाला आश्चर्यचा धक्काच बसला. तर झाले असे की, ज्वालामुखीजवळ पोहचल्यावर जॅरडने मैत्रीण एलिसनला लग्नाची मागणी घातली.

 

जॅरड आणि एलिसन काही दिवसांपूर्वी इंडोनेशियाच्या टूअरसाठी आले होते. त्यामुळे दोघांनी माउंट ब्रोमोच्या ज्वालामुखीवर जाण्याचा निर्णय घेतला. दोघांनी सोबत 7600 फुट ऊंच असलेला पर्वत सर करायला सुरूवात केली. ज्वालामुखीच्या कडेवर पोहचताच, जॅरड गुडघ्यावर बसला आणि एंगेजमेंट रिंग काढून एलिसनला लग्नाची मागणी घातली, हे ऐकून एलिसन थोडी गोंधळली पण स्वतःला सावरून तिने लग्नाला होकार दिला.


होकारानंतर खाली घेऊन आली एलिसन
या दोघांची पहिली भेट ओटावामध्ये टीचर एजुकेशन प्रोग्राम दरम्यान झाली होती. आणि विशेष म्हणजे दोघांनाही फिरणे आणि ट्रॅकिंग खूप आवडते. एकमेंकाच्या आवडीमुळे लवकरच मैत्री झाली. सध्या दोघे 'अव्हर मूव्हिंग रूट्सट नावाने ट्रव्हल ब्लॉग चालवतात. या दोघांनी आपल्या प्रपोजलचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर अपलोड केला आहे. व्हिडीओमध्ये जॅरेडने सांगितले आहे की, 6 फेब्रुवारी 2019, हा दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. पण अचानक मिळालेल्या या सप्रराइजमुळे एलिसन खूप आनंदी आहे. 

 

मित्रांचे मानले आभार
जेव्हा तिला मी प्रपोज केले तेव्हा तीला एक धक्काच बसला कारण एकीकडे ज्वालामुखीतून धूर निघत होता आणि या बाजूने माझे प्रपोजल. अशा परिस्थितीत एखाद्याचे गोंधळणे साहजिक आहे. पण काही सेकंदाने तिने माझा प्रस्ताव स्विकार करून मला अलिंगन दिले. यानंतर आम्ही खाली उतरून आनंद साजरा केला. यासाठी आम्ही आमचे मित्र जेनी आणि स्तू यांचे आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच ओटावामध्ये आमची पहिली भेट झाली होती.