आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खात्यावर 1000 कोटींचे Bitcoin जमवून घेतला जगाचा निरोप, कुणालाच माहिती नाही Password!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओटावा - कॅनडाचा नागरिक असलेला एका युवा आंत्रोप्रन्योर गेराल्ड कॉटनचा दुर्धर आजाराने मृत्यू झाला. गेराल्डच्या निधनाच्या काही दिवसांतच त्याच्या खात्यात अब्जावधींचे बिटकॉइन सापडले. या बिटकॉइनची किंमत तब्बल 18 कोटी कॅनेडियन डॉलर अर्थात जवळपास 1 हजार कोटी रुपये आहे. दुर्दैव म्हणजे, त्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी आपल्या बिटकॉइन खात्याचा पासवर्ड कुणालाही सांगितलेला नव्हता. त्याची विधवा झालेल्या जेनिफर रॉबिन्सनला सुद्धा याचा काहीच पत्ता नाही. त्यामुळे, हजारो कोटी रुपयांचे बिटकॉइन आता कुणालाही मिळणार नाही का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


भारतात मदतकार्य करताना झाला होता आजार
गेराल्ड कॉटनने वयाच्या विशीत असतानाच क्वाड्रिगा नावाची एक कंपनी स्थापित केली. या कंपनीच्या माध्यमातून तो बिटकॉइनचा व्यवहार करत होता. बिटकॉइन एक आभासी चलन असून त्याचा डिजिटल किंवा ऑनलाइन पद्धतीने व्यवहार होत असतो. बिटकॉइनच्या मार्केटनुसार, त्यांची किंमत कमी किंवा जास्त होत असते. त्याने याच कंपनीच्या माध्यमातून आपल्या संगणकावर ठेवलेल्या बिटकॉइन खात्यात अब्जावधी रुपयांचे बिटकॉइन जमा केले आणि झटक्यात श्रीमंत बनला. याच दरम्यान, तो भारतात एका अनाथाश्रमाची सेवा करण्यासाठी सुद्धा आला होता. यावेळी गेराल्डला 'क्रॉह्न्स' नावाचा आजार झाला. Crohn's Disease हा पोटाचा एक विकार आहे. यात रुग्णांना अपचन, पोटात तीव्र वेदना, हगवण आणि अचानक वजन कमी होणे किंवा कुपोषणाच्या समस्या उद्भवतात. 30 डिसेंबर 2018 रोजी वयाच्या 30 व्या वर्षी त्याचे निधन झाले.


शेकडो ग्राहकांचे आहेत हे बिटकॉइन
गेराल्डची विधवा जेनिफरने सांगितल्याप्रमाणे, त्याने हयात असताना कधीही आपल्या बिटकॉइन अकाउंटचा पासवर्ड सांगितलेला नाही. त्याच्या निधनानंतर तज्ञ आणि हॅकर्सच्या मदतीने तिने गेराल्डच्या मोबाईल व टॅबलेटवर असलेल्या बिटकॉइन खात्याचा पासवर्ड मिळवला. परंतु, संगणकावर सर्वाधिक 950 कोटी रुपयांचे बिटकॉइन आहेत. जे त्याच्या काही ग्राहकांचे आहेत. मात्र, या संगणाकाचा पासवर्ड तिला कुठेही मिळाला नाही. गेराल्डने पासवर्ड लिहून ठेवला असावा या विचाराने तिने अख्खे घर शोधून काढले. परंतु, काहीच हाती लागलेले नाही.


खरोखर मृत्यू झाला की पळून गेला?
क्वाड्रिगा कंपनीचे VP डीन स्कुर्का यांनी गेराल्डच्या मृत्यूवरच संशय व्यक्त केला आहे. त्यांनी एका माध्यमाशी संवाद साधताना कटकारस्थानाचा संशय व्यक्त केला. गेराल्डची विधवा जेनिफर आपल्या पतीचा मृत्यू झाला असा दावा करत आहे. परंतु, त्यांनी क्रॉह्न्स रोगाने गेराल्ड मृत्यू नेमका कसा झाला याचे कारण अद्याप समोर आले नाही. कदाचित गेराल्ड जिवंत असावा असा संशय स्कुर्का यांनी व्यक्त केला. हीच शंका व्यक्त करताना त्यांनी कोर्टात खटला दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...