आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुले करत नव्हते सांभाळ म्हणून वृद्धाने घेतली कोर्टात धाव, कोर्टाच्या आदेशानंतर मुलांना परत करावी लागली पित्याची संपत्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळ - मुलांनी वयस्कर वडिलांचा सांभाळ केला नाही म्हणून कोर्टाने वृद्धाच्या मालकीची संपूर्ण संपत्ता त्यांना परत करण्याचे आदेश दिले. हे प्रकरण आहे केरळच्या पलक्कडमधील. कोर्टाच्या निर्णयानंतर आता ही वृद्ध व्यक्ती संपत्ती गहाण ठेवणार असून कोर्ट त्या मोबदल्यात बँक त्यांना दर महिन्याला खर्चासाठी पैसे दईल. 


तीन मुली एक मुलगा 
मीडिया रिपोर्ट्सनुसार या ज्येष्ठ व्यक्तीला डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचा आजार आहे. चार वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संपत्तीची वाटणी झाली आणि वडील मुलांबरोबर राहू लागले. पण हळू हळू त्यांना जाणीव झाली की, मुले त्यांची नीट काळजी घेत नाहीत. 


जुलैमध्ये केली तक्रार 
पुलकक्कुटथिल हम्सा नावाच्या या ज्येष्ठ व्यक्तीने जुलैमध्ये मुलांची तक्रार कोर्टात केली. ते म्हणाले की, ते यावयात काही करू शकत नाही. कोर्टाने आधी सुनावणी करत मुलांनी दरमहा वडिलांना पाच हजार रुपये देण्याचा आदेश दिला. पण मुले ऐकली नाहीत. त्यानंतर कोर्टाने त्यांच्या मुलाविरोधात मेन्टनन्स अँड वेल्फेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनिअर सिटीझन अॅक्ट 2007 अंतर्गत कारवाईचा आदेश दिला. त्या अंतर्गत बँक हम्सा यांच्या संपत्तीचा ताबा घेऊन त्यांना महिन्याचा खर्च देईल. 


कोर्टाच्या आदेशानुसार वडिलांच्या मृत्यूनंतर जर वारसांना संपत्ती परत हवी असेल तर त्यांनी बँकेचे कर्ज फेडून संपत्ती परत घ्यावी. 

बातम्या आणखी आहेत...