आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेरारजींचा ‘भारतरत्न’ काढून घ्या मागणीची याचिका रद्द; ५० हजार दंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिवंगत माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना दिलेला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार काढून घेण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटळाली. तसेच ही याचिका “अर्थहीन’ असल्याचे सांगत संबंधित वकिलाला न्यायालयाने ५० हजार रुपये दंड भरण्याचे निर्देश दिले. जनार्दन जयस्वाल असे याचिकाकर्त्या वकिलाचे नाव आहे. जयस्वाल यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, देसाई यांनी आपल्या “द स्टाेरी ऑफ माय लाइफ’  या आत्मचरित्रात अनेक वादग्रस्त मते व्यक्त केली आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्यांना मी हुतात्मे मानत नाही. तसेच अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले आहे. पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीला अशी वक्तव्ये शोभत नाहीत. त्यामुळे त्यांचा केंद्र सरकारने त्यांना दिलेला भारतरत्न पुरस्कार काढून घ्यावा, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. 

सुनावणीदरम्यान न्यायालय म्हणाले की, वकील असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारची अर्थहीन याचिका दाखल करणे अपेक्षित नाही. त्यामुळे जयस्वाल यांनी तातडीने ५० हजार रुपयांचा दंड भरावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. 

बातम्या आणखी आहेत...