आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजला आहे ही महिला, म्हणाली, 'द कपिल शर्मा शो' तिच्यासाठी लाइफ लाइन आहे, पुढचे सर्व ऐकून इमोशनल झाला कपिल, महिलेला दिले आलिंगन : Inside Photos

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : कपिल शर्माचा शो 'द कपिल शर्मा' मध्ये यावेळी सलमान खान आपले पिता सलीम खान आणि भाऊ अरबाज, सोहेल यांच्यासोबत आला होता. शोमध्ये सलमान आणि त्याचे पिता सलीम खान यांनी फिल्म इंडस्ट्रीतीळ अनेक किस्से ऐकवले. पण शोमध्ये आलेली कपिल शर्माच्या एका फिमेल फॅनने सर्वानाच इमोशनल केले. शोमध्ये कपिलची एक जबरा फॅन आली होती जी कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजला आहे. महिला फॅनने कपिलला सांगितले की, ती त्याची खूप मोठी फॅन आहे आणि अगदी सुरुवातीपासून 'द कपिल शर्मा शो' चे सर्व एपिसोड पाहून आनंदी राहते. हा शो तिच्यासाठी लाइफलाइन आहे असे तिने सांगितले. 

 

महिला फॅनने केल्या कपिलकडे अनेक तक्रारी... 
- महिला फॅनने कपिलला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. तिने सांगितले की,तिची इच्छा आहे की कपिलने आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. यासोबतच तिने कपिलकडे आपली नाराजी आणि आणि खूप तक्रारीही केल्या. 

 

- ती म्हणाली, "ती या गोष्टीमुळे खूप नाराज आहे की, कपिलचा शो एका वर्षापासून टेलीकास्ट झाला नव्हता. कपिलला त्यांनी खूप मिस केले. आणि ती कपिलच्या शोचे दिवसातून 3-4 वेळा रिपीट एपिसोड पाहून स्वतःला खुश ठेवते. कॉमेडी पाहून तिला वाटते की, ती ठीक होत आहे. पण जेव्हा हा शो बंद झाला होता तेव्हा तिचा सपोर्ट सिस्टम थांबला होता"

 

- "मी जास्त वेळ उभीराहू शकत नाही पण तरीही कपिलला भेटण्यासाठी अर्ध्या रात्री प्रवास करत इथपर्यंत आले आहे". तिचे बोलणे ऐकून कपिल खूप इमोशनल झाला आणि त्याने स्टेजच्या खाली येऊन महिलेला आलिंगन दिले. कपिलने त्या महिलेचे खूप आभार मानले आणि ती म्हणाला की, मी प्रार्थना कारेन की, त्या लवकर ठीक व्हाव्या आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो. 

 

पुढील स्लाइड्सवर पहा कपिलच्या महिला फॅनचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...