आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतामध्ये कॅन्सर हे मृत्यूचे दुसरे सर्वांत मोठे कारण आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शन अँड रिसर्चच्या अभ्यासानुसार दरवर्षी कॅन्सरचे सात लाख रुग्ण समोर येतात. यापासून वाचण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या वस्तू खा.
1. टाेमॅटो
न्यूट्रिशन अँड कॅन्सरच्या अभ्यासानुसार यात लायकोपिनचे प्रमाण जास्त असते. जे कॅन्सरच्या पेशींची वाढ होण्यास थांबवते.यामुळे फुप्फुस, प्रोस्टेट आणि पोटाच्या कॅन्सरपासून बचाव करते. एका आठवड्यात जेवणामध्ये टोमॅटो खाल्ल्यास प्रोस्टेट कॅन्सरचा धोका जवळपास १८ टक्के कमी होतो. यामुळे वजन कमी करण्यास तसेच संधिवातापासून वाचण्यास मदत होते.
कसे खावे : टोमॅटोचे सूप किंवा सलाद खा. याचा रस पिणेही फायदेशीर आहे.
2. ब्रोकली
युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या अभ्यासानुसार ब्रोकलीमध्ये असणारे सल्फोराफेन कॅन्सर पेशींची निर्मिती होऊ देत नाही. यात फायटोकेमिकल्स असते, जे शरीरातील टॉक्सिन्स दूर करते. यामुळे स्तन, यकृत, फुप्फुसे, प्रोस्टेट, त्वचा आणि मूत्राशयाच्या कर्करोगापासून बचावण्यास फायदेशीर आहे. यात फॉलेट अधिक प्रमाणात असते, जे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.
3. लसूण
लोवा वुमेन्स हेल्थ स्टडीनुसार ज्या महिला लसूण खातात, त्यांच्यात कोलोन कॅन्सरचा धोका लसूण न खाणाऱ्या महिलांच्या तुलनेत ५० टक्के कमी होऊन जातो. यात असणारे फायटोकेमिकल्स कॅन्सरची शक्यता कमी करते. यामुळे इन्सुलिनची निर्मिती कमी होऊन शरीरात ट्यूमर होऊ देत नाही आणि ब्रेस्ट, कोलोन आणि पोटाच्या कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत होते.
कसे खावे
याला सलाद किंवा ऑम्लेटमध्ये मिसळून खावे. याची भाजी किंवा सूपदेखील घेऊ शकता.
4. गाजर
यात असणारे अल्फा आणि बीटाकॅरोटिन्स कॅन्सरच्या पेशी वाढू देत नाही. गाजर गर्भाशय, मूत्राशय, पोट आणि स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी प्रभावी आहे. यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित करून हार्टअॅटॅकचा धोका कमी करण्यास मदत होते.
कसे खावे : गाजराला सलादमध्ये टाकून खा. भाजीत टाकून किंवा याचा रस बनवून प्या.
5. कॉफी
यात असणारे अँटिऑक्सिडंट्स कॅन्सरच्या पेशी तयार होऊ न देण्यासाठी मदत करतात. टोकियो येथे असणारे नॅशनल कॅन्सर सेंटरमधील अभ्यासक्रमामध्ये १०,००० लोकांवर संशोधन केल्यानंतर जवळपास रोज कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये यकृताचा कॅन्सर होण्याची शक्यता ५० टक्क्यांनी कमी होते.
कसे प्यावे: कमी साखर असलेली किंवा ब्लॅक कॉफी प्यावी. यात लिंबू टाकून प्यायल्यास जास्त फायदेशीर आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.