आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Candidates For Mayor In This Vermont Town: 3 Candidates, 2 Dogs In The US Northeastern City

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेतील एका शहरात महापौर पदासाठी तीन प्राण्यांनी भरला अर्ज, निवडणूक मैदानात 2 कुत्रे तर एक बकरी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरीकेतील फेयर हेवनचे महापौरपद मार्च 2019 पासून एका बकरीकडे आहे

वर्मोंट- अमेरिकेतील उत्तर पूर्वेला असलेल्या वर्मोंटच्या फेयर हेवन गावाच्या महापौर पदाच्या शर्यतीत तीन प्राणी मैदानात आहेत. यात एक बकरी आणि दोन कुत्रे आहेत. मार्च 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत हे पद तीन वर्षीय न्यूबियन लिंकन बकरीकडे गेले. यावर्षीच्या निवडणुकीत लिंकन, 6 वर्षीय सॅमी आणि मफी हे दोन कुत्रेदेखील आहे. मतदान तीन मार्चला होणार आहे. नागरिकांना मतदान करण्यासाठी एक डॉलर द्यावा लागेल.


अमेरिकेतील या शहरात प्राण्याच्या निवडणुकीमागे एक खास उद्देश आहे. शहरातील मुलांना खेळण्यासटी कम्‍युनिटी प्‍ले ग्राउंड तयार करणे, हा यामागचा उद्देश आहे. या निवडणुकीतून मिळालेल्या फंडमधून मुलांसाठी प्ले ग्राउंड तयार केले जाईल. टाउन मॅनेजर जो गुन्टरने सांगितले, निवडणुकीत रजिस्ट्रेशन करण्याची फीस 5 डॉलर आहे.

मैदान बनवण्यासठी 57 लाख रुपयांची गरज, आतापर्यंत 7 लाख जमा झाले

मीडिया रिपोर्टनुसार, ग्राउंड बनवण्यासाठी निवडणुकीशिवाय गोफंडमी नावाचे पेजदेखील आहे. मैदान बनवण्यासाठी 80,000 (57.5 लाख रुपए) डॉलरची गरज आहे. आतापर्यंत 10000 (7.15 लाख रुपए) डॉलर जमा झाले आहेत.