ड्रग्स ओढण्यासाठी रिकाम्या / ड्रग्स ओढण्यासाठी रिकाम्या घरात घुसला, आत पाहताच उतरली नशा! असा पळाला मागे वळून पाहण्याचेही झाले नाही धाडस

Feb 14,2019 12:02:00 AM IST

न्यूयॉर्क - अमेरिकेतील ह्युस्टन येथे ड्रग्स ओढणाऱ्यासोबत जे काही घडले ते ऐकूण सगळेच हैराण आहेत. सहज एक दिवस गांजा ओढण्यासाठी त्याने रिकामे घर शोधले. आत कुणीच नसल्याची खात्री करून त्यामध्ये घुसला. नशा करत असतानाच त्याला जे काही दिसले ते पाहून त्याची नशाच उतरली. एवढेच नव्हे, तर पळून आपला जीव वाचवल्यानंतर त्याने सर्वांनाच आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. परंतु, लोकांना तर सोडा पोलिसांना सुद्धा त्याच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. अनेकांनी तर तो नशेत बड-बड करत असावा असे गृहित दरून विषय सोडला. परंतु, त्याने पाहिलेली गोष्ट खरी ठरली.


घरात होता पूर्णपणे विकसित वाघ...
ही घटना टेक्सास प्रांतातील ह्युस्टन शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडली आहे. तो कुणी राहत नसल्याचे समजून ज्या घरात घुसला, त्यामध्ये एक गॅरेज होते. याच गॅरेजच्या शेजारी शांतपणे तो गांजा ओढत होता. तेवढ्यात त्याला काही विचित्र आवाज ऐकू आले. आत कोण आहे याचा शोध घेण्यासाठी त्याने डोकावून पाहिले तेव्हा गॅरेजमध्ये एक खरा-खुरा वाघ होता. त्याच्या आपबितीवर कुणीच विश्वास ठेवला नाही. परंतु, खूप विनवण्या केल्यानंतर पोलिस त्याच्यासोबत संबंधित घरात गेले. तेव्हा खरंच त्या ठिकाणी एका पिंजऱ्यामध्ये वाघ होता.


पिंजऱ्याच्या शेजारीस मांसाचे काही पॅकेट सुद्धा पडले होते. त्या घरात कुठलीही व्यक्ती सापडली नाही. अशात वाघाची काळजी कोण घेत होता असा प्रश्न पोलिसांना पडला. पोलिसांनी यानंतर वाघाला गुंगीचे औषध देऊन तेथून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. हे वाघ एक मादा असून त्याचे वजन 450 किलो इतके होते. सध्या घराच्या मालकाचा आणि या वाघाला अशा परिस्थितीत ठेवण्यास जबाबदार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

X