आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cannes Film Festival 2019 : On The Next Day Deepika Gets Trolled, One User Said, 'Now She Looks Like Ranveer's Wife'

कान्स फिल्म फेस्टिवल 2019 : दुसऱ्या दिवशी ड्रेसमुळे ट्रोल झाली दीपिका, यूजर म्हणाले - 'आता वाटते आहे रणवीरची पत्नी'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : शुक्रवारी संध्याकाळी दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा कान्स 2019 च्या रेड कार्पेटवर चालली. पहिल्या दिवशीच्या लूकने सर्वांना घायाळ करणारी मस्तानी दुसऱ्या दिवशी पॅरोट ग्रीन ड्रेसमढेब दिसली. या ड्रेसला कम्प्लीट करण्यासाठी तिने डोक्यावर हसबंड स्कार्फ घातला होता. दीपिका या लुकमध्ये सुंदर वाटत होती. पण काही लोकांनी या लुकमुळे तिला खूप ट्रोल केले. सोशल मीडियावर दीपिकाचा लुक पती रणवीर सिंहपासून इंस्पायर असल्याचे सांगितले गेले. 

 

असा होता दीपिकाचा लुक... 
दीपिकाने कान्समध्ये दुसऱ्या दिवशी डिजायनर गिआम्बेटिस्टाचा ड्रेस घातला होता. तिने डोक्यावर पिंक स्कार्फ बांधला होता. याला हसबंड स्कार्फदेखील संबोधले जाते. तिने ड्रमेटिक ड्रेससोबत स्मोकी आईज, न्यूड मेकअप आणि मिडल पार्टेड बनने आपला लुक कंम्पलीट केला होता.  

 

लोक म्हणाले कच्चा आंबा... 
दीपिकाच्या लुकला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. एका यूजरने लिहिले, ड्रेस तसाही खूप ड्रेमेटिक आहे तर हेडपीसची काय गरज होती. तसेच एका दुसऱ्या यूजरने लिहिले, 'मेट गालामध्ये नॉर्मल कपड़े घातले आणि कान्समध्ये ड्रामेटिक लुकमध्ये आली. एकाने तर दीपिकाला कच्च्या आंब्याच्या फ्लेवरचा बर्फगोळाच म्हणले. 

 

पती रणवीरने केले कौतुक... 
दीपिकाला पहिल्या दिवशी रेड कार्पेटव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या लुकमध्ये पहिले गेले. तिचा प्रत्येक लुक सर्वांना आवडलादेखील. पण दुसऱ्या रेड कार्पेट लुकला काही खास पसंत केले जात नाहीये. लोकांनी भले दीपिकाला ट्रोल केले असेल. पण तिचा पती रणवीरला मात्र तिचा हा लुक खूप आवडला आणि त्याने इंस्टाग्रामवर दीपिकाच्या लुकचे खूप कौतुक केले.  

बातम्या आणखी आहेत...