Home | International | Other Country | Cannibal russian who killed 30 people and made pickle out of their dead bodies

Cannibals: मानवी मांसाचे लोणचे खायचा हा नरभक्षक कपल; घरात होते इतके भयंकर दृश्य...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 09, 2018, 12:06 AM IST

पोलिस त्यांना अटक करण्यासाठी घरी पोहोचले तेव्हा त्यांना घरात लपवून ठेवलेले 8 धड नसलेले मानवी शिर सापडले होते.

 • Cannibal russian who killed 30 people and made pickle out of their dead bodies

  इंटरनॅशनल डेस्क - रशियातील क्रासनोदर गतवर्षी एका नरभक्षक कपलला बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांनी केलेली कृत्ये पाहून पोलिसांनाही घाम फुटले होते. गेल्या 18 वर्षांपासून हे कपल लोकांना मारून त्यांचे मांस खात होते. आतापर्यंत त्यांनी अशा प्रकारे 30 जणांची कत्तल केली अशी कबुली दिली. पोलिस त्यांना अटक करण्यासाठी घरी पोहोचले तेव्हा त्यांना घरात लपवून ठेवलेले 8 धड नसलेले मानवी शिर सापडले. एवढेच नव्हे, तर फ्रिजमध्ये या नरभक्षक कपलने मानवी मांसाने बनवलेले लोणचे ठेवले होते.


  मानवी मांसाचे बनवले लोणचे
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय दमित्री बाकेशेवने माणासांना मारून त्यांचे मटन खालल्याचे मान्य केले आहे. आपल्या पत्नीसह 1999 पासून तो हे वीभत्स काम करत होता. दमित्रीची पत्नी नतालिया (42) एक नर्स असून तिने सुद्धा आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांना या दोघांनाही अटक केली. कित्येक दिवस लोकांना मारून, त्यांचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवत होते. ते खाऊनही या नरभक्षकांचे मन भरले नाही. त्यांनी लोकांचे मांस छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये कापून त्याचे लोणचे सुद्धा तयार केले होते.


  तळघरात सापडल्या 19 मानवी कातड्या
  कपलने आपल्या घरातच एक तळघर बनवले होते. याच ठिकाणी ते मारलेल्या लोकांचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवत होते. मानसिक विकृतीचा कळस गाठणाऱ्या नरभक्षक जोपड्यांनी माणुसकीच्या सर्व सीमा ओलांडल्या. लोकांचे बॉडी पार्ट्स वेग-वेगळे ठेऊन ते पार्ट्ससोबत सेल्फी सुद्धा घेत होते. तळघरात पोलिसांनी धाड टाकली, त्यावेळी या ठिकाणी 19 मानवी कातड्या सापडल्या आहेत. लोकांना ठार मारून ते त्यांची स्किन सोलून काढत होते. आरोपींचे मोबाईल फोन देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यामध्ये या नरभक्षकांनी विक्षिप्त मृतदेह, मानवी अंग, स्किन सोलून काढलेल्या बॉडीजसोबत काढलेल्या सेल्फी आणि छायाचित्रे सापडली आहेत.


  अशी करत होते शिकार
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या नरभक्षक जोडप्याची भेट आणि विवाह कधी झाला याबद्दल काहीच उलगडा झालेला नाही. हे दोघे लष्करी परिवाराचे होते. आणि त्याच क्वार्टरमध्ये राहत होते. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या दोघांनी सांगितल्याप्रमाणे, लोकांना अमली पदार्थ देऊन ते शिकार करत होते. अमली पदार्थाच्या नशेत असतानाच ते पीडितांवर वार करून त्यांना ठार मारायचे यानंतर त्यांची कातडी सोलून तुकडे करत होते. सुरुवातीला हे दोघे मानसिक दिवाळखोर असल्याचा संशय पोलिसांना आला होता. मात्र, मानसिक चाचण्या केल्या असत्या ते दिवाळखोर नाहीत असे निष्पन्न झाले आहे.


  पुढील स्लाइड्सवर पाहा, नरभक्षकांच्या घरात घुसणाऱ्या पोलिसांना काय-काय सापडले...

 • Cannibal russian who killed 30 people and made pickle out of their dead bodies
 • Cannibal russian who killed 30 people and made pickle out of their dead bodies
 • Cannibal russian who killed 30 people and made pickle out of their dead bodies
 • Cannibal russian who killed 30 people and made pickle out of their dead bodies

Trending