आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाल्दाय - कोर्टाने एका युवकाला प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. युवकाने प्रेयसीच्या डोक्यावर वाइनच्या बाटलीने प्रहार करत तिची हत्या केली. यानंतर तिच्या शरीराचे अवयव कापत रक्तही प्राशन केले. सैतानाला प्रसन्न करण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे एक प्रत्यक्षदर्शी म्हणाला. विशेष म्हणजे मृत महिला ही तरुणापेक्षा 22 वर्षांनी मोठी होती. सुनावणीदरम्यान युवकाने केलेल्या खुलाशामुळे सर्वांनाच धक्का बसला.
सैतानाला बोलवत होता आरोपी
- वाल्दाय शहरात राहणाऱ्या दमित्री ल्युचिन (23) याने त्याची प्रेयसी ओल्गा बुदुनोवाला ड्रिंक डेटवर नेऊन निघृणपणे तिची हत्या केली.
- आरोपीने महिलेच्या डोक्यावर वाइनच्या बॉटलने वार करत तिचा जीव घेतला. त्यानंतर मेंदू बाहेर काढून भाजून खात रक्तही प्राशन करत होता.
- आरोपीच्या शेजारी राहणाऱ्या एलेक्जेंड्रा डेडोवा (21) हिने कोर्टात साक्ष देताना सांगितले की, दमित्रीने महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या रक्ताने दरवाजावर सैतानाचे चिन्ह काढले होते. सोबतच महिलेच्या पाठीवर नेल पॉलिशने शिवी लिहिली होती.
- शेजाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आरोपी सैतानाला बोलावण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी त्याने 5 मिनिटे वाट पाहिली; पण सैतान प्रकट झाला नाही. मग त्याने महिलेच्या शरीराचे तुकडे केले.
सीरियल किलर्सचा फॅन आहे आरोपी
- कोर्टात सुनावणीदरम्यान फिर्यादीच्या वकिलाने सांगितले की, दमित्रीला सिरियल किलर्सच्या गोष्टी वाचण्याची आवड आहे. त्यांच्यापासून प्रेरित होऊन त्याने कट रचून महिलेची हत्या केली.
- वैद्यकीय चाचणीत दमित्री मानसिकदृष्ट्या निरोगी असल्याचे आढळून आले आहे. नोवगोरॉड कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने आरोपीला दोषी ठरवत 19 वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
- कोर्टात सांगण्यात आले की, दमित्रीवर एका अमेरिकन सिरियल किलर आणि नरभक्षी जेफ्री लियोनल देहमरचा मोठा प्रभाव होता. त्या सिरियल किलरने 1978 ते 1991 दरम्यान 17 जणींवर बलात्कार करून त्यांची हत्या केली होती.
आरोपीचे उत्तर ऐकून सर्वांनाच बसला धक्का
- शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीने कोर्टात असे काही सांगितले की, ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. तो म्हणाला की, मी एक सामान्य विद्यार्थी, एक खेळाडू आणि एक कवी आहे. बाकी जे काही सांगण्यात आले ते सगळं खोटं आहे. तरी मी आपणास विनंती करतो की आपण समजूतदारपणे निर्णय घ्या आणि मला माफ करा. एक निष्पाप मनुष्य तुरुंगात जाता कामा नये, असेही तो पुढे म्हणाला.
पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.