आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथा एका नरभक्षी महिलेची, लोकांच्या हत्या करून त्यांच्या मांसाचे तयार करायची लोणचे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया - येथे एका महिलेबाबत धक्कादायक खुलासा झाला. ही महिला लोकांची हत्या केल्यानंतर त्यांनी मारून खाऊन टाकायची. अनेक दिवस ती मानवी मांस घरातील मोठ्या रेफ्रिजरेटरमध्ये स्टोर करून ठेवायची. पोलिसांनी तिच्या घरी छापा मारला तेव्हा घरातून मानवी मांसापासून तयार केलेले लोणचे जप्त केले. पोलिसांनी या महिलेला पकडले तेव्हा तिने सांगितले की, तिच्या राक्षसी कृत्यांमध्ये तिचा पतीही तिची साथ द्यायचा. 


घरात होते भयावह वातावरण 
पोलिसांच्या मते रशियाच्या क्रसनोदर शहरात राहणारे दिमित्री बाकशाएव्ह आणि त्यांची पत्नी नतालिया दोघे नरभक्षी होते. त्यांना या संशयाच्या आधारे अटक केली आणि घराची झडती घेतली तेव्हा जवळपास 8 लोकांचे बॉडी पार्ट्स सापडले. 


लॅबमध्ये मानवी मांसाच्या लोणच्याची तपासणी 
आरोपी एवढे सनकी होते की, दोघांनी मानवी मांसाचे लोणचे तयार करून ठेवले होते. लॅबमध्ये टेस्ट केल्यानंतर याबाबत खुलासा झाला. नतालिया नर्स होती, त्यामुळे तिला सहज शिकार सापडायचे. 


वाचण्यासाठी दिले विचित्र कारण 
नतालियाने कोर्टात वाचण्यासाठी विचित्र युक्तिवाद केला. त्यांनी लोकांना मारलेच नाही, तर ती प्रॅक्टीस करण्यासाठी डेडबॉडी घरी आणायची असे तिने सांगितले. अनेक वर्षांपूर्वी दजेरजिंस्कोगो स्ट्रीटवर एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. अनेक दिवसांच्या तपासानंतर नतालिया आणि दिमित्रीवर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी छापा मारला तर त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर मानवी मांस आढळले. 


अंधविश्वासाने केले सर्वकाही 
मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघे आरोपे अंधश्रद्धाळू होते. त्यांचा जादू-टोण्यावर विश्वास होता. यात ते एवढे वाहावत गेले की, घरीच बळी देऊ लागले. मांस कापण्यासाठीची अनेक शस्त्रेही पोलिसांना सापडली. 

 

अखेरची शिकार बनली वेट्रेस 
एका हॉटेलची वेट्रेस त्यांची शेवटची शिकार ठरली. ही वेट्रेस पतीच्या मागे असल्याचा संशय नतालियाला आला. त्यामुळे तिने पतीला सांगितले की तिला घरी बोलव आणि तिची हत्या कर. नतालियाचा पती सनकी होता आणि ती सांगेल ते सर्व ऐकत होता. त्यामुले त्याने घरी बोलावून तिची हत्या केली तुकडे तुकडे करून आणि डोके डीप फ्रीजरमध्ये ठेवले. 


30 हत्यांची कबुली 
पोलिसांनी दोघांना खुनी आणि नरभक्षी ठरवत अटक केली. कोर्टात सादर केले तेव्हा दोघांनी गुन्हा मान्य करण्यास नकार दिला. पण पोलिसांनी त्यांच्या भाषेत विचारल्यानंतर त्या दोघांनी 30 जणांची हत्या केली आणि त्यांचे मांस खाल्ल्याचे मान्य केले. दोघांना जन्मठेप झाली. 

बातम्या आणखी आहेत...