आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • "Can't Understand Why Papa Gets Emotional After Watching My Movie: Meghna Gulzar

'पप्पा माझा चित्रपट पाहून भावुक होतात की त्याचा विषय पाहून, हे आजपर्यंत मला समजलेले नाही...' : मेघना गुलजार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः गुलजार यांची मुलगी मेघना गुलजार सध्या आपला आगामी चित्रपट "छपाक'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दैनिक भास्करसोबत झालेल्या खास चर्चेत तिने या चित्रपटाशी संबंधित अनुभव शेअर केले. तसेच वडिलांसोबतच्या बॉन्डिंगवरही चर्चा केली...

'माझ्या पप्पांनी (गुलजार साहेब) मी बनवलेला चित्रपट 'छपाक'चा रफ कट पाहिला आहे, क्लायमॅक्स पाहिलेला नाही. कट पाहून ते भावुक झाले आणि नेहमीच होतात. तथापि, मुलीचा चित्रपट आहे म्हणून भावुक होतात की, त्याचा विषय पाहून, हे आजपर्यंत समजले नाही. असे का होते, याचे उत्तर नेहमी त्यांना विचारते तेव्हा ते म्हणतात, दोन्हीही गोष्टी आहेत आणि याचा मला अधिकार आहे.' अशा प्रकारे बॉलिवूड लेखिका-दिग्दर्शिका मेघना गुलजारने वडील आणि मुलगी यांच्यातील प्रेमळ नात्याबद्दल सांगितले आहे. दैनिक भास्करसोबत झालेल्या खास चर्चेदरम्यान तिने 'छपाक'शी संबंधित अनुभवदेखील शेअर केले.

  • चर्चा कमी हल्लेच जास्त होतात

गेल्या तीन वर्षांपासून दिल्लीमध्ये अॅसिड हल्ल्यातील पीडितांच्या भेटी घेत आहे. केवळ चित्रपटासाठी नव्हे तर त्यांना जाणून घेण्यासाठीही. मी त्यांच्या संस्थेत जाते आणि वेळ घालवते. सर्वांचे अनुभव जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. संपूर्ण टीमला प्रत्येक मुलीची कथा माहीत आहे. त्यांच्यावरील हल्ल्याबाबतही ते जाणतात. तिथे प्रत्येक मुलीची स्वतंत्र कथा आहे. प्रत्येक कथा जवळून जाणली. लोकांच्या मनामध्ये हा विषय म्हणावा तेवढा उतरलेला नाही. त्यामुळेच इतके अॅसिड हल्ले होतात. चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न आहे.

  • शीर्षक मी ठरवले, वडिलांनी नाही

शीर्षकाबाबत बोलायचे झाल्यास छपाकच्या मागे मीच आहे, माझे वडील नाहीत. आधी दोन शीर्षक गंधक आणि छपाक मनात आले होते. गंधक गाण्यामध्ये योग्यरीत्या बसत नाही. त्यामुळे दुसऱ्या शीर्षकाची निवड केली.

  • चित्रपटात चार पीडितांनी केला अभिनय

चित्रपटामध्ये चार खऱ्या पीडितांनीही अभिनय केला आहे. या सर्व मुली खूप आत्मविश्वासू आहेत. त्या घाबरत नाहीत. त्यांना जगासोबत चालायचे आहे. सर्वजणी गुणवंत आहेत. त्यामुळेच चारही मुलींनी चित्रपटात उत्तम काम केले आहे. हे माझ्यासाठी प्रेरणादायक आहे.

  • दीपिका-लक्ष्मीमध्ये साम्य

'दीपिका आणि लक्ष्मीमध्ये काही बाबतीत साम्य आहे. दोघींचे डोळे किंवा स्माइल एकसारखीच आहे, असे म्हणता येणार नाही. तर लक्ष्मी हल्ला होण्यापूर्वी जशी होती तशीच दीपिकाही वाटते.'

  • बदलला नव्हता राजीचा क्लायमॅक्स

'राजी' ज्या पुस्तकावर आधारित आहे त्यात तीन कथा आहेत. एक पाकिस्तानला जाऊन येण्याची, दुसरी डिप्रेशन व मुलाच्या जन्माची आणि तिसरी धार्मिकता अंगीकारण्याची. तीन धड्यांपैकी एकाची निवड केली. कारण मला दोन तासांचा चित्रपट बनवायचा होता. क्लायमॅक्समध्ये बदल केलेला नाही. ही बाब पुस्तकाच्या लेखकाला माहीत आहे आणि त्यांनी रिलीजपूर्वी चित्रपट पाहिला होता.