आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत vs न्यूझीलंड महिला वनडे सिरीज : न्यूझीलंड विजयी; कर्णधाराचा 200 वा वनडे; पुन्हा पराभव  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॅमिल्टन- भारत आणि न्यूझीलंड महिला टीम यांच्यात शुक्रवारी वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंड टीमने आठ गड्यांनी सामना जिंकला. हा सामना म्हणजे एक दिवसाआधी रोहितच्या नेतृत्वात झालेल्या टीम इंडियाच्या झालेल्या सामन्याचे रिपीट टेलिकास्टच मानले जाते. याच मैदानावर गुरुवारी भारताचा पुरुष संघ पराभूत झाला.  हा सामना प्रभारी कर्णधार रोहितचा २०० वा वनडे होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी भारतीय महिलांना येथे पराभवाचा सामना करावा लागला.  हा योग महिला कर्णधार मितालीच्याही बाबतीत घडून आला. तिचाही करिअरमधील हा २०० वा वनडे सामना होता.मात्र, तिलाही पराभव टाळता आला नाही.  

 

प्रथम फलंदाजी करताना भारताने १४९ धावा काढल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने २९.२ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात सामना जिंकला.भारताने दोन विजयाच्या बळावर ही तीन वनडे सामन्यांची मालिका २-१ ने आपल्या नावे केली.

 

बातम्या आणखी आहेत...