आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णधार विराट काेहलीने संभाजी राजेंच्या माेहिमेसाठी खास मदतीचाही दिला शब्द!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाराष्ट्रामध्ये क्रिकेटसाठी चांगले वातावरण आहे. याचाच फायदा येथील गुणवंत खेळाडूंना झालेला आहे. येथील क्रिकेटला यशाच्या उंचीवर नेण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या टॅलेंट सर्च माेहिमेला माझी खास मदत लाभेल, असा शब्द टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने रविवारी  खासदार आणि एमसीए सदस्य संभाजी राजे यांना दिला. पुणे येथील कसाेटी विजयानंतर काेहलीने घेतली खासदार आणि एमसीए सदस्य संभाजी राजे यांची भेट घेतली. यादरम्यान संभाजी राजे यांनी आपण राज्यातील युवांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी माेहीम राबवणार असल्याचे सांगितले. यावर काेहलीने राजे यांचे खास काैतुकही केेले. तसेच आपल्या या माेहिमेदरम्यान काेणत्याही प्रकारच्या मदतीसाठी तत्पर असू, असेही त्याने सांगितले. संभाजी राजे यांची नुकतीच महाराष्ट्र क्रिकेट असाेसिएशनच्या अपेक्स काैन्सिलमध्ये सदस्यपदी निवड झाली. 

गड-किल्ल्यांना देणार भेट; असेल खास महाराष्ट्र दाैरा
शिवाजी महाराजांच्या पराक्रम मी शालेयस्तरावर अभ्यासले आहे. त्यांच्या प्रत्येक माेहिमांमधून एक वेगळीच उर्जा मिळते. याच महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये मी आलाे आहे. त्यामुळे येथील गड-किल्ल्यांना भेट देण्याची माझी  इच्छा आहे. यासाठी महाराजांच्या रायगड किल्ला मला पाहायचा आहे, अशी इच्छाही काेहलीने  व्यक्त केली. त्यासाठी त्याने खास महाराष्ट्राचा दाैरा करण्याचेही संकेत दिले. त्यामुळे काेहली लवकरच दाैऱ्यावर येणार असल्याची चर्चा आहे.