आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Car Accident In Hoshangabad; Four National Hockey Players Died, Three Serious Injured

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्यप्रदेशात कारचा भीषण अपघात; चार राष्ट्रीय हॉकी खेळाडूंचा मृत्यू, तीन जण गंभीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होशंगाबाद - मध्य प्रदेशच्या होशंगाबाद येथे सोमवारी सकाळी एक रस्ते अपघातात चार राष्ट्रीय स्तरावरली हॉकी खेळाडूंचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. हे सर्व होशंगाबाद येथे आयोजित एका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात होते. दरम्यान त्यांची कार इटारसी आणि होशंगाबाद दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 69 वर एक झाडावर आदळली.  सकाळी 6:45 वाजता हा अपघात घडला 

मिळालेल्या माहितीनुसार सर्व खेळाडू होशंगाबाद येथे ध्यानचंद अकॅडमी अखिल भारतीय हॉकी ट्रॉफीत उपांत्य सामना खेळण्यासाठी जात होते. हॉकीपटू आदर्श हरदुआ याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आयोजकांकडून परवानगी घेऊन रविवारी रात्री इटारसी येथे गेले होते. सकाळी परतत असताना रैसलपूर येथे ही घटना घडली. 

वाढदिवसादिवशीच मृत्यूने कवटाळले 
या स्पर्धेचे आयोजक नीरज यांनी भास्करला सांगितले की, ही घटना सकाळी 6:45 वाजता घडली. जखमींना होशंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये आदर्श हरदुआ, ग्वालियरचे अनिकेत, इंदौर के शहनवाज आणि जबलपूर येथील आशिष लाल यांचा सहभाग आहे. 
 

मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मदतीचे दिले आश्वासन