आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूममध्ये कार-दुचाकी अपघातात तरुण ठार, दोघे गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 भूम  - परांडा रोडवरील माउली मंदिराजवळ रविवारी (दि.२०) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत वांगी येथील एक तरुण जागीच ठार झाला असून अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. 


शंकर महारुद्र गवळी (२६),शशिकांत गुंजाळ व सूरज जाधव हे तिघे (एम एच -१३ ,८०४४) दुचाकीवरून शेतात जात होते. या वेळी समोरून कारने(एमएच १४ जी ए  ८६१७) दुचाकीला धडक दिली. यामध्ये शंकर गवळी याचा जागीच मृत्यू झाला. शंकर गवळी याला स्वतःची शेती नसल्याने त्याच्या वडिलांनी एमआयडीसीजवळ दुसऱ्याची शेती वाट्याने केली आहे. त्या शेतात गाईची धार काढण्यासाठी शंकर मित्रांसोबत शेतात चालला होता. शंकर हा मूळचा वांगी येथील रहिवासी असून, सध्या आई वडिलांसोबत शहरातील शिवाजीनगर भागात वास्तव्यास होता. जखमी शशिकांत गुंजाळ याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात तर सूरज जाधव याच्यावर भूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळी शंकरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी भूम पोलिसांत सोमवारी दुपारी गुन्हा नोंद करण्यात आला. 

 

अपघातग्रस्त कारचे टायर चोरीला 
विशेष बाब म्हणजे अपघात झालेल्या कारमधील कुटुंब पुण्यातील राहटणीचे होते. कारमधील कोणालाही इजा झाली नाही.पोलिस पंचनामा करून परतल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कारचे चारही टायर, बॅटरी, कारटेप  लंपास केल्याचे दिसून आले. या प्रसंगावरून या भागात चोरट्यांचाही उच्छाद असल्याची बाब अधोरेखित झाली. 

बातम्या आणखी आहेत...