राजस्थान / राजस्थान : टायर फुटल्याने कार दुचाकीवर आदळली; कोचिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यासह दुचाकीस्वाराचा मृत्यू

कार उलटून झाली सरळ; परंतु बाइक त्यात अडकली

वृत्तसंस्था

Jun 28,2019 11:07:01 AM IST

सीकर - राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील भदाला ढाणी भागात बुध‌वारी एक वेगवान कार टायर फुटल्याने दुचाकीवर जाऊन काेसळली. या अपघातामुळे कोचिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यासह दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारमधील तिघेही घटनास्थळावरून पळून गेले. सुरेशकुमार भाट (२५) व राम बाजडाेलिया अशी मृतांची नावे आहेत, असे पाेलिसांनी सांगितले. या घटनेत कार थेट दुचाकीवर जाऊन काेसळली व नंतर सरळ झाली; परंतु दुचाकी त्यात अडकली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

X
COMMENT