आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर-दौंड महामार्गावर उभ्या ट्रकवर कार धडकून ४ जण ठार; गुरुवारी भल्या पहाटेची दुर्घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर - उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून कार धडकून झालेल्या अपघातात चार तरुण जागीच ठार झाले.हा अपघात नगर-दौंड महामार्गावरील बाबुर्डी बेंद परिसरात बुधवारी मध्यरात्री घडला. अनिकेत भुजबळ (२२), शुभम खेडकर (२२), आसिफ  पठाण (२२) व गोपीनाथ गजानन कुऱ्हाडे (२७) अशी मृतांची नावे आहेत.
 
हे चौघेजण बुधवारी रात्री श्रीगोंद्याहून नगरकडे कारने येत होते. कार महादेव वस्तीजवळ आली असता उभ्या मालट्रकला पाठीमागून कारची धडक बसली. कार पूर्णपणे ट्रकच्या मागील बाजूने आत घुसून तिचा चक्काचूर झाला. त्यात कारमधील चौघांचा  मृत्यू झाला. अपघातानंतर झालेल्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यासह इतरांनी मदतकार्य केले. कारमधील चारही तरुणांना जेसीबीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 

अनिकेतचा होता दिवाळीनंतर विवाह
अनिकेतचा काही दिवसांपूर्वी श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथील मुलीशी साखरपुडा झाला होता. दिवाळीनंतर विवाह होणार होता. मात्र, नियतीने अनिकेतवर विवाहापूर्वीच घाला घातला.