आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमध्ये CRPF ताफ्याजवळ कारचा स्फोट, पुलवामा दहशतवादी हल्ल्यासारखी शक्यता?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बनिहाल- येथील श्रीनगर-जम्मू हायवेवर जवाहर टनलजवळ एका कारमध्ये स्फोट झाला. ज्यावेळेस हा स्फोट झाला त्यावेळी सीआरपीएफ जवानांचा ताफा त्या ठिकाणावरून जात होता. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. पोलिसांच्या तपासात कळाले की, स्फोट कारमधील सिलींडरच्या फुटण्याने झाला. या स्फोटात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. या स्फोटानंतर कारचालक फरार आहे. सध्या पोलिस तपास करत आहेत की, चालक स्फोटाच्या नंतर पळाला का आधी, शिवाय यात दहशदवाद्यांचा हात तर नाहीये ना याचाही तपास सुरू आहे. यामागे पुलवामा दहशतवादी हल्ल्यासारखा कट असल्याची शक्यता नाकारता येत नाहीये. 
 


सीआरपीएफन दिलेल्या माहितीनुसार शनिवारी बनिहालजवळ 10.30 वाजता एका कारमध्ये स्फोट झाला. ज्या जागी स्फोट झाला, तेथूनच सीआरपीएफचा ताफा जात होता. ताफ्यात जवळपास 40 जवान प्रवास करत होते. या स्फोटामुळे गाड्यांची काही काचे फुटली आहेत, पण यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाहीये. सीआरपीएफने सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...