आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायकलच्या धडकेमुळे बोनट तुटले; पोलिसांचाही दुजोरा; चीनमधील शेनजान शहरातील घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनमध्ये एक अजब अपघाताचे प्रकरण गाजत आहे. येथे एका सायकल व कारच्या धडकेत सायकलचे नुकसान झाले नाही. उलट कारच्या बोनटचे खूप नुकसान झाले. या अपघाताचे छायाचित्र प्रसिद्ध होताच काही लोकांनी याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.

आता नोकिया मोबाइल कंपनीने सायकल निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे का? मोबाइलप्रमाणेच त्यांची सायकल मजबूत बनवलीय का? असा सवालही मिश्कीलपणे विचारण्यात आला आहे, तर काही लोकांनी ही छायाचित्रे व व्हिडिओज बनावट असल्याचे म्हटले आहे.

 

मात्र, शेनजान शहर पोलिसांनी एक निवेदन जारी केले असून या अपघाताचा व्हिडिओ व छायाचित्रे बनावट नसल्याचे म्हटले आहे. छायाचित्रात काही छेडछाड केली नसल्याचेही म्हटले आहे. या अपघातात सत्यता आहे. कारचालकास मार लागलेला नाही, परंतु सायकलस्वार जखमी झाला आहे, असे म्हटले आहे.