आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार दुभाजकाला धडकली, वर्धेतील दोन विद्यार्थी ठार, यवतमाळच्या भोसा महामार्गावर भीषण अपघात

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

यवतमाळ : क्रिकेट सामने खेळून गावाला परतणाऱ्या विद्यार्थ्यांची भरधाव कार रस्ता दुभाजकावर धडकल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. शहरातील भोसा मार्गावरील पुलाजवळ शनिवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. जयेश प्रवीण लोहिया व अक्षद अभिषेक बेद (दोघेही वय ११) अशी मृतांची नावे असून, दर्श सुमित ढाबलीया आणि रूमित अजय उर्फ कवडू गुळघाणे वाहनचालक प्रवीण लोहिया अशी जखमींची नावे असून, सर्व वर्धा येथील रहिवासी आहेत.

वर्धा येथील रामनगर स्वावलंबी स्कूलमधील विद्यार्थी ब्रदर्स हुड नावाच्या क्रिकेट क्लबकडून यवतमाळ शहरातील गोदणी मार्गावर सुरू असलेले क्रिकेट सामने खेळायला सर्वजण आले होते. शनिवारी सायंकाळी चार विद्यार्थी कारने वर्धा येथे गावी जात होते. या वेळी चालकाचे नियत्रंण सुटल्याने भोसा मार्गावरील पुलाजवळ त्यांची कार रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात जयेश लोया आणि अक्षद बैद यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
 

बातम्या आणखी आहेत...