आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात गुंडांचा धुमाकूळ; गाडीचे नुकसान, तडीपार आरोपींचा प्रताप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अकोला : न्यू तापडिया नगरातील पवन नगरीत एका घरात घुसून तीन गुंडांनी धुडगूस घातला, या वेळी त्यांनी घरासमोर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून दहशत माजवली व कारमधील चार लाख रुपये लंपास केले. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. रात्री उशिरा सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तीनही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 


हेमंत भगीरथ मिश्रा हे एचडीएफसी फायनान्स मध्ये वसुली एजन्सी चालवतात. फायनान्स घेतलेले कर्ज वसुलीचा त्यांचा व्यवसाय आहे. रविवारी रात्री ते घरी नसताना तिघे जण त्यांच्या घरी आले. घराचे गेट बंद असल्याने एकाने गेटवरून उडी टाकली. यावेळी घरातून महिलेचा आवाज आला असता दुसऱ्याने दारातील फरशी काढून कारच्या काचेवर मारली. तर तिसऱ्याने कारमधील तीन ते चार लाख रुपये असलेली रक्कम काढून घेतली व तिघेही पळून गेले. तिघांचेही कृत्य सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाले आहे. घटनेची माहिती सिव्हिल लाइन पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. या वेळी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यामध्ये दोन तडीपार केलेल्या आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. रविवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस गुंडांचा शोध घेत आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...