आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढा भीषण अपघात की खांबाला धडकून कारच्या उडाल्या चिंधड्या, भयंकर दृश्य मोबाइलमध्ये टिपताना दिसले लोक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर, छत्तीसगड - रविवारी सकाळी एका भरधाव कार अनियंत्रित होऊन खांबाला धडकली. अपघातात कारचालकाचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे. मृत तरुणाचे नाव प्रांजल त्रिपाठी असे आहे. मृत प्रांजल त्रिपाठी वाल्फोर्ट सिटीचा रहिवासी होता. हा अपघात भाठागाव फिल्टर प्लांटजवळ झाला आहे. स्थानिकांच्या मते, धडक एवढी वेगात झाली की कारच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. या अपघाताचे दृश्य एवढे भयंकर होते की, घटनास्थळी पोहोचलेले लोक याला आपल्या मोबाइलमध्ये कैद करताना दिसले. पोलिसांनी नोंद करून मृताच्या कुटुंबीयांना सूचित केले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...