आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारची ट्रॅक्टरला जोरदार धडक; ट्रॅक्टरचे दोन तुकडे, कारमधील तिघे गंभीर जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोणगाव फाट्यावर झालेल्या अपघातात ट्रॅक्टरचे असे दोन  भाग झाले. - Divya Marathi
डोणगाव फाट्यावर झालेल्या अपघातात ट्रॅक्टरचे असे दोन भाग झाले.

पाचोड - रस्ता ओलांडणाऱ्या ट्रॅक्टरला भरधाव कारची जोराची धडक बसली. या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील डोणगाव फाटा येथे दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास घडली.

बीडहून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारने (एमएच २४ एएफ ५१८९) डोणगाव फाट्यावर रस्ता ओलांडणाऱ्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टरचे मात्र दोन तुकडे झाले. या शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी नवीन ट्रॅक्टर घेतले असून शेतातून घरी गावात जात असताना डोणगाव फाट्यावरील रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. यात प्रतिभा सूर्यकांत मांडकर(६०), पुरुषोत्तम मधुकर सांगोळे (५५), सुनीता पुरुषोत्तम सांगोळे (४५, सर्व रा.लातूर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून खासगी गाडीने लातूर येथे हलवण्यात आले आहे.