आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव कारने मॉर्निंग वॉक करणार्‍या दाम्पत्याला चिरडले, असे हवेत उडाले पती-पत्नी, घटना कॅमेर्‍यात कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धडक एवढी भीषण होती की, पती-पत्नी हवेत उडून खाली पडले.
मुंबई- वसईतील एव्हर शाइन नगरात झालेला भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका दाम्पत्याला भरधाव कारने चिरडले. धडक एवढी भीषण होती की, पती-पत्नी हवेत उडून खाली पडले. कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

 
ही घटना शुक्रवारी (21 डिसेंबर) सकाळी घडली. मीर सिकंदर अली (पती) आणि मीर सलमा अली (पत्नी) या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अज्ञात कार चालकाविरोधात वसई पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बातम्या आणखी आहेत...