आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिझनेस डेस्क - लोक कार खरेदी करण्यासाठी कार लोनला पसंती देतात. कार लोनचा कालावधी 3 ते 5 वर्षांचा असतो. पण काही बँका 7 वर्षांसाठीचे कार लोन सुद्धा देतात. कार लोनचा कालावधी जितका जास्त असतो तितकी त्याची EMI रक्कम कमी असते. यामुळे कार खरेदी करणे सोपे होते. परंतु, अशात आपल्याला कार लोन घेतल्यावर व्याज म्हणून मूळ रकमेपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. यासाठी कार लोन खरेदी करण्यासाठी काही गोष्टींविषयी जाणून घेणे गरजेचे आहे.
कार लोन घेण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी
व्याज दर
> कार लोनमध्ये बँकेद्वारे आकारण्यात येणारा व्याज दर अधिक महत्वपूर्ण असतो. प्रत्येक बँकांचा व्याज दर वेगवेगळा असतो.
प्रोसेसिंग फी
> बँकेद्वारे कार लोनच्या प्रक्रियेसाठी प्रोसेसिंग फीस आकारण्यात येते. सामान्यत: ही आपल्या कार लोनची एक खास टक्केवारी असते. तर काही बँकांद्वारे प्रोसेसिंग फीस आकारण्यात येत नाही.
कर्जाचा कालावधी
> आपण किती कार लोन घेणार आहात आणि त्यावर प्रत्येक महिन्यात किती EMI भरू शकता याचे अनुमान घ्या. यानुसार आपल्या कार लोनचा कालावधी निश्चित करा.
प्री-क्लोजर शुल्क
> आपल्याकडे कर्ज परतफेडीच्या दरम्यान जास्त पैसे आले आणि आपण कालावधीच्या अगोदर कार लोन फेडणार असाल तर आपण कर्ज घेण्यापूर्वी बँकेकडून प्री-क्लोजर शुल्काबद्दल माहिती घ्यावी. कारण काही बँकांद्वारे प्री-क्लोजर शुल्क आकारण्यात येते.
हमीदाराची आवश्यकता
> कार लोन सुरक्षित कर्जाच्या श्रेणीमध्ये येते. असे असुनही काही बँक हमीदाराची मागणी करतात. पण हे अनिवार्य नाही.
5 वर्षांच्या कालावधीसाठी हे आहेत 1 लाख रूपयांसाठी विविध बँकांच्या कार लोनसाठीचे व्याज दर
बँक | व्याज दर (% मध्ये) | EMI(रुपये मध्ये) | प्रोसेसिंग फी (विना टॅक्स) |
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स | 8.75-9.25 | 2064-2088 | कर्ज रकमेचा 0.5% (किमान 500 आणि जास्तीत जास्त 7,000 रुपये + टॅक्स) |
कॉरपोरेशन बँक | 8.85-10.0 | 2069-2125 | काहीही नाही |
पंजाब अॅन्ड सिंध बँक | 8.90-9.06 | 2071-2078 | काहीही नाही |
बँक ऑफ बडोदा | 8.90-10.65 | 2071-2157 | काहीही नाही |
यूको बँक | 8.95-9.05 | 2073-2078 | काहीही नाही |
करूर वैश्य बँक | 9.00 2076 | 2076 | 10 लाखांच्या कार लोन वर 2000 + सर्व्हिस टॅक्स, 10 लाखांपेक्षा जास्त कर्जासाठी 4000 रुपये + सर्व्हिस टॅक्स |
कॅनरा बँक | 9-9.65 | 2076-2108 | कर्ज रकमेच्या 0.25 टक्के |
येस बँक | 9.01 | 2076 | 5000-10,000 रूपये |
अलाहाबाद बँक | 9.05-10.05 | 2078-2127 | कर्ज रकमेचा 0.50 टक्के, कमाल 8,696 रूपये |
युनायटेड बँक ऑफ इंडिया | 9.10-9.15 | 2081-2083 | काहीही नाही |
IDBI Bank | 9-9.60 | 2076-2105 | 1,000 रूपये + सर्व्हिस टॅक्स |
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.