National Special / गरमीपासून बचाव करण्यासाठी महिलेने लढवली अनोखी शक्कल, कारला केले शेणाचे कोटींग, फोटोज होत आहेत व्हायरल

शेणाचा यापेक्षा चांगला उपयोग पाहिला नाही

दिव्य मराठी वेब टीम

May 22,2019 03:27:00 PM IST

अहमदाबाद(गुजरात)- येथील एका कारची सोशल मीडियावर चांगली चर्चा होत आहे. तसेच लोकांनाही ही गाडी आवडली असून महिलेच्या कल्पनेची प्रशंसा करत आहेत. सध्या शहराचे तापमान 45 अंशापर्यंत पोहचले आहे, म्हणून गरमीपासून बचाव करण्यासाठी एका महिलेने आपल्या कारला शेणाचा लेप लावला आहे.


रूपेश गौरंग नावाच्या व्यक्तीने यांनी हा प्रकार पाहिला तर त्यांनी कारचे फोटो फेसबुकवर शेअर केले. त्यांनी लिहले की, मी शेणाचा यापेक्षा चांगला उपयोग पाहिला नाही. या फोटोमध्ये टोयोटाची प्रीमियम सिडान कार कोरोला दिसत आहे.


गायीच्या शेणाचे वैशिष्ट्ये
गायीचे शेण इंस्यूलेटर्ससारखे काम करते. तज्ञांच्या मते, कारच्या वरच्या बाजूने लावण्यामुळे, बाहेरच्या वातावरणातून येणाऱ्या उष्ण हवा आतमध्ये येऊ देत नाही. यामुळे कारमध्ये थंड वातावरण राहते. तसेच, आजही ग्रामीण भागात घरांवर, जमीनीवर भिंतीना शेणाचा लेप लावला जातो. त्यामुळे थंडीत घर गरम राहते आणि उन्हाळ्यात थंड वातावरण राहते. याव्यतिरिक्त, शेणाचा वापर किटकांना आणि डासांना दूर ठेवण्यासाठी केला जातो. असा दावा केला जातो की, गायचे मुत्र अनेक आजारांवर उपाय करते.

X
COMMENT