आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहापूर येथील उड्डाणपुलावर बसची वाट पाहणाऱ्या लोकांना भरधाव कारची धडक; पूलावरून खाली पडून 4 जणांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ठाण्यातील उड्डाणपुलावर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एका भरधाव कारने धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, गर्दीतील अनेक जण ब्रिजच्या खाली फेकले गेले. या अपघातात 16 वर्षांच्या एका मुलासह 4 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तसेच 5 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई- आग्रा महामार्गावर शहापूर येथील किण्हवली उड्डाणपूलावर शनिवारी सकाळी 7 वाजता हा अपघात झाला. प्रवाशी नाशिकला जाणाऱ्या बसची वाट पाहत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी 4 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये 2 लहान मुलींचा आणि एका दाम्पत्याचा देखील समावेश आहे. त्या सर्वांना शहापूर येथील ग्रामीण रुग्णालयातून ठाणे सरकारी रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले आहे. स्थानिक आमदार पांडुरंग बरोडा यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

 

मृतांची नावे
श्रीराम पाटोळे (वय 45, रा.शेंदरुण)
दौलत वामन दवणे  (वय 35, रा.सावरोली)
आदित्य योगेश नवगिरे, (वय 16, रा.डोळखांब)

 

जखमींची नावे
जयंत देविदास नेरकर (वय 56)
छाया लोखंडे (वय 40)
विद्या नवगिरे (वय 13)
पुष्पा विकास भरसाळे (वय 13)

बातम्या आणखी आहेत...