आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Auto
  • Car Sales Decrease By 40%; Nearly 250 Dealerships Closed In The Country, 25 Thousand People Unemployed

देशात कारच्या विक्रीत ४०% घट; दीड वर्षात देशात सुमारे २५० डीलरशिप बंद, २५ हजार लोक बेरोजगार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ऑटोमोबाइल कंपन्यांच्या पॅसेंजर कारची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी एप्रिल-जूनच्या तिमाहीत ४०% कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या १८ महिन्यांत २५० डीलरशिप बंद झाल्या आहेत. त्यामुळे २५ हजारांवर लोक बेरोजगार झाले आहेत.


फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनचे (फाडा) उपाध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले की, ऑटोमोबाइल कंपन्यांना झालेल्या तोट्याचा अंदाज लावणे कठीण आहे. पण या संकटाचा परिणाम म्हणजे गेल्या दीड वर्षात देशात सुमारे २५० डीलरशिप बंद झाल्या आहेत. त्यांच्या बहुतांश डीलरशिप मुंबई, दिल्ली, चेन्नई, पुणे यांसारख्या शहरांत आहेत. त्या बंद झाल्याने २५ हजारपेक्षा जास्त लोकांचा रोजगार गेला आहे. स्पष्टच सांगायचे तर सर्व ऑटो कंपन्या सध्या तरी नफ्यात आहेत. 


या संकटावर मात करण्याची पद्धत ऑटोमोबाइल कंपन्यांनी शोधली आहे. आतापर्यंत साधारणत: एक किंवा दोन वेळाच प्लँट बंद राहतात. तेही सफाई आणि वार्षिक देखभालीसाठी. पण आता जवळपास सर्व कंपन्यांचे प्लँट जानेवारी महिन्यापासून ब्लाॅक क्लोजर करून उत्पादन घटवत आहेत. त्याचे एक कारण म्हणजे जागेचा अभाव. गाड्या तयार करून त्या ठेवायच्या कुठे, असा प्रश्न आहे. 


डीलरचीही स्थिती सध्या या कंपन्यांसारखीच आहे. त्यांच्याकडे साठा एवढा वाढला आहे की, ते प्लँटवरून गाड्या घेऊच शकत नाहीत. या वर्षी मे महिन्यात ७ कंपन्यांनी ब्लाॅक क्लोजर केले होते. जून महिन्यामध्येही चार-पाच कंपन्यांनी ब्लाॅक क्लोजर केले. असेही वृत्त आले होते की, भारतीय बाजारात ३.५ कोटी कारचा साठा पडून आहे.