आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूर-वैजापूर रोडवर कारने ट्रकला दिली धडक; एक जण ठार, दोन गंभीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कारने खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात चुकीच्या बाजूने घुसून ट्रकला दिली धडक

गंगापूर - गंगापूर-वैजापूर रोडवर वरखेड पाटीजवळ  कार व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये  एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात दि. १३ राेजी पहाटे झाला. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. १३ रोजी पहाटे ३:३० ते ४:०० वाजेच्या सुमारास अंदरसुल ता.येवला येथील स्विफ्ट कार गंगापूरकडे जात असताना वरखेड फाट्याजवळ वैजापूरकडे कांदा घेऊन येत असलेल्या ट्रकला  (क्रमांक एमएच ०४ इल ०२९३)  कारचालकाने खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात चुकीच्या बाजूने घुसून धडक दिली. यात कारमधील राहुल दिनकर अप्पा सोनवणे रा.अंदरसुल ता.येवला हे ठार झाले. तर शीतल सोनवणे व कारचा चालक दत्तात्रय उत्तम घोले रा.अंदरसुल हे गंभीर जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच मयत राहुल सोनवणे हे येवला तालुक्यातील अंदरसुलहून वैजापूर गंगापूर मार्गे मढीला जात असताना हा अपघात झाला. मयत राहुल यांचे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.