आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालक उतरला अन् न्यूटल कार ५०० फूट लांब जाऊन पुलाखाली काेसळली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फर्दापूर- चालक कारमधून खाली उतल्यानंतर न्यूटल कार तब्बल पाचशे फूट लांब जाऊन पुलाखाली कोसळली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून जीवितहानी झाली नाही. परंतु, या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. 

 

बुधवारी दुपारच्या सुमारास जळगाववरून औरंगाबादकडे सँट्रो कार (एमएच १२ एचएफ १९३४) जात असताना फर्दापूर येथील हुतात्मा स्मारकासमोरील हॉटेलवर कार थांबवून चालक खाली उतरला. चालक खाली उतरताच न्यूटल कार तब्बल पाचशे फूट लांब जाऊन पुलाखाली कोसळली. सुदैवाने रस्त्यात कोणतेही वाहन न आल्याने मोठी दुर्घटना टळली. 

बातम्या आणखी आहेत...