आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Cardiac Arrest To Young Man Wearing Tight Jeans On Long Drive, Doctors Saved His Life By Giving 45 Minutes CPR

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टाइट जिन्स पॅन्ट घालून लाँग ड्राइव्हवर गेलेल्या तरुणाला कार्डिअॅक अरेस्ट, डॉक्टरांनी 45 मिनीट सीपीआर देऊन प्राण वाचवले  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलग 8 तास ऑटोमॅटिक कार चालविल्यामुळे पायांची हालचाल झाली नाही, रक्त गोठले आणि बेशुद्ध पडला

नवी दिल्ली- टाइट जिन्स पॅन्ट घालून लाँग ड्राइव्हवर गेलेल्या दिल्लीतील एका तरुणाला कार्डिअॅक अरेस्टनंतर रुग्णालयात दाखल करावे लागले. हार्ट बीट आणि पल्स थांबण्यासोबतच अवयव निळे पडू लागले. डॉक्टरांनी 45 मिनीटापर्यंत सीपीआर दिला, त्यानंतर हार्ट बीट आणि पल्स सुरू झाली. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, टाइट जिन्समध्ये सगल 8 तास ऑटोमॅटिक कार चालवण्यादरम्यान पायांमध्ये रक्त गोठले, त्यानंतर फुफ्फुसात ते गेले आणि त्यामुळे तरुण बेशुद्ध झाला. पीतमपूराचा रहिवासी सौरभ शर्मा 10 ऑक्टोबरला कारने ऋषिकेशला गेला होता. तिथे गेल्यावर त्रास सुरू झाल्याने दुसऱ्या एका व्यक्तीच्या मदतीने ते परत दिल्लीला परतले. घरात आल्यानंतर ते अचानक बेशुद्ध पडले त्यानंतर तात्काळ त्यांना दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात भर्ती करण्यात आले. चेकअपमध्ये समजले की, पल्मोनरी इम्बोलिज्ममुळे सौरभ यांना कार्डिअॅक अरेस्ट आला. फुफ्फुसातील धमन्यांमध्ये अपुरा रक्तप्रवाह झाल्यास, त्याला पल्मोनरी इम्बोलिज्म म्हणतात.

टाइट कपड्यांमुळे पल्मोनरी इम्बोलिज्म होतो
 
हृदय रोग विभागाचे अध्यक्ष डॉ. नवीन भामरी यांनी सांगितले की, सौरभ यांचा श्वास थांबला होता. बीपी किंवा पल्सदेखील रेकॉर्ड होत नव्हती. त्यांना लघवीदेखील येत नव्हती. सीपीआरमुळे त्यांचा ह्रदयाचे ठोके सुरू झाले आणि त्यांना शुद्ध आली. 24 तासात त्यांचा बीपी स्थिर झाला. संपूर्ण चेकअपनंतर कळाले की, संपूर्ण प्रवासात ते टाइट कपडे घालून बसले होते, त्यामुळे त्यांना पल्मोनरी इम्बोलिज्म झाला.