आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्सच्या वृद्धाश्रमांमध्ये 'जोरा' रोबोटद्वारे वृद्धांची देखभाल 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये वयाेवृद्ध नागरिक स्वत:च्या देखभालीसाठी त्यांचे नातेवाईक किंवा केअरटेकर-नर्सवर अवलंबून नसतात. कारण तेथे एका प्रकल्पांतर्गत वृद्धाश्रमांत व रुग्णालयांत ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एअाय) नेटवर्कपासून बनवलेले 'जोरा' रोबोट ठेवण्यात अाले अाहेत. हे रोबोट सकाळी उठण्यापासून ते झाेेपण्यापर्यंतच्या सर्व शारीरिक क्रियांत वृद्धांना मदत करत अाहेत. ते ज्यांना ही सेवा देत अाहेत, त्यांना 'जौरे' म्हटले जाते. ते ज्येष्ठ नागरिकांना तंदुरुस्त राहण्यासाठी काेणता व्यायाम करावा, हेदेखील सांगतात. एवढेच नव्हे, तर त्यांच्याकडून नियमितरीत्या व्यायाम करवून घेतात व त्यांना बगिच्यातही मॉर्निंग वॉकला एक तास घेऊन जातात. या रोबोट‌्सचे वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्या ज्येष्ठ नागरिकास एकटेपणा व उदास वाटत असेल तर स्वत:च्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून गाणे एेकवतात. तसेच नृत्य करून त्यांचे मनोरंजनही करतात.मुलांसारखे दिसणाऱ्या या रोबोटकडून सेवा घेणाऱ्या सोफी यांनी सांगितले की, हे रोबोट नियमितपणे अामचा रक्तदाब तपासतात, अाैषधे घेऊन येतात व अाम्हाला घेण्यास सांगतात. लहान मुलांप्रमाणे त्यांच्या नटखट हालचालींमुळे एकटे असल्याची जाणीवही हाेत नाही. ते २४ तास अामची खूप काळजी घेतात. अामच्या केंद्रात १६ ज्येष्ठ नागरिक अाहेत. विशेष म्हणजे, आराम करताना डिस्टर्बही करत नाहीत व कोणी उशिरापर्यंत खाेलीतून बाहेर न पडल्यास बाेट धरून इतर जण असलेल्या ठिकाणी नेतात. 


बेल्जियममधून आणले रोबोट, एकाची किंमत सुमारे १३ लाख : फ्रान्सने या केअरटेकर 'जोरा' रोबोट‌्सना बेल्जियमच्या एका कंपनीतून मागवले अाहे. एका रोबोटची किंमत १२ लाख ७८ हजार रुपयांच्या जवळपास अाहे. हल्ली अमेरिका, अाशियासह अरब देशांत अशा हजार रोबोट‌्सचा पुरवठा केला. 

मुलांसारखे दिसणारे हे 'जोरा' रोबोट वृद्ध नागरिकांना हरतऱ्हेने अानंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. 

बातम्या आणखी आहेत...