Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | carom seeds health benefits in Marathi

अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे ओवा, तुम्हीही ट्राय करा

दिव्य मराठी | Update - Mar 14, 2019, 12:01 AM IST

ओव्याचा वापर हजारो वर्षांपासुन आजारांवर घरगुती उपाय म्हणुन केला जातो, आयुर्वेदानुसार ओव्यामुळे पचनक्रिया सुधारते....

 • carom seeds health benefits in Marathi

  ओव्याचा वापर हजारो वर्षांपासुन आजारांवर घरगुती उपाय म्हणुन केला जातो. आयुर्वेदानुसार ओव्यामुळे पचनक्रिया सुधारते. हे कफ, पोट, छाती चे दुखणे आणि कीटकांचे रोगांसाठी फायदेशीर आहे. यासोबतच उचकी, ढेकर या आजारांसाठी फायदेशीर ठरतो. येथे जाणून घ्या, ओव्याचे काही खास घरगुती उपाय..


  - पोटात गॅस तयार झाल्यामुळे होणाऱ्या वेदनांपासून सुटका करून घेण्यासाठी ओव्याला हलक्या आचेवर तव्यावर भाजून घ्यावे. नंतर हा भाजलेला ओवा एखाद्या कापडात किंवा विड्याच्या पानावर टाकून पोटावर ठेवावे किंवा पोटाला बांधावे. यामुळे पोटदुखीचा त्रास कमी होतो.
  - ओव्याच्या सेवनाने भूक वाढते, त्यामुळे जेवणामध्ये याचा वापर नियमितपणे करावा. ज्या लोकांना भूक लागत नाही, त्यांच्यासाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर सिद्ध होऊ शकते.
  - पोटाशी संबंधित समस्या असल्यास रुग्णाला चहामध्ये ओवा टाकून पिण्यास द्यावा. यामुळे रुग्णाचा त्रास कमी होण्यास मदत होईल.


  - ओव्याचे सेवन केल्याने छातीतील जळजळ, डायरिया, मळमळणे, उलटी येणे आणि अॅसिडिटीपासून सुटका होते.
  - छातीत कफ तयार झाल्यास भाजलेला ओवा मधातून घेतल्याने आराम मिळतो.
  - दातदुखीमध्येही ओवा सहायक आहे. अशा स्थितीत लवंग तेलात ओव्याचे तेल मिसळून वेदना होत असलेल्या दातावर एक-दोन थेंब टाकावेत.


  - डोकेदुखी असल्यास किंवा मायग्रेनचा झटका आल्यावर ओव्यापासून तयार केलेल्या पावडरचा वास घेतल्याने रुग्णाला आराम मिळतो.
  - आर्थरायटिसमध्ये गुडघा किंवा शरीराच्या इतर सांध्यात होणाऱ्या वेदनेतून सुटका करून घेण्यासाठी ओव्याचे तेल त्या भागावर लावल्यास आराम मिळतो.
  - ज्या लोकांना नेहमीच कफ होतो त्यांच्यासाठीही ओवा फायदेशीर आहे. 100 मि.लि. पाण्यात थोडा ओवा टाकून काही मिनिटे धिम्या आचेवर उकळून घ्यावा. थंड झाल्यावर या मिश्रणाचे सेवन करावे. यामध्ये तुम्ही साखरही मिसळू शकता.


  - पोटात दुखत असल्यास तेलात ओव्याचे थोडेसे दाणे टाकून गरम करावेत. कोमट झाल्यावर या तेलाने पोटाचा हलका मसाज करावा. यामुळे वेदना कमी होतात.
  - मासिक पाळीतील होणाऱ्या वेदनेपासूनही ओव्याचे सेवन केल्याने आराम मिळतो. ओव्याचे चार-पाच दाणे चावून खाल्ल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो.

Trending