आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Carry Condoms, Accept Rape: Filmmaker Disgusting Advisory For Girls After Hyderabad Murder News And Updates

'मुलींनी बलात्कार स्वीकारावे, कंडोमही द्यावे!' चित्रपट निर्मात्याचा संतापजनक सल्ला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • म्हणाला, मुलींना सेक्स एजुकेशनसह बलात्काराविषयीही सांगावे
  • सरकारने अहिंसक बलात्काराला प्रोत्साहित करण्याचा दिला सल्ला

न्यूज डेस्क - हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर पाशवी बलात्कार आणि खून प्रकरणी देशभर संताप उमटत असताना एका तेलुगू डायरेक्टरने त्यात तेल ओतण्याचे काम केले आहे. डॅनिएल श्रवण असे या चित्रपट दिग्दर्शकाचे नाव असून त्याने मुलींना बलात्कार स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे. एवढेच नव्हे, तर बलात्काऱ्यांना कंडोम देखील मुलींनीच द्यावे जेणेकरून त्यांची हत्या होणार नाही असे संतापजनक विधान सुद्धा या माथेफिरूने केले आहे. डॅनिएलने आपल्या फेसबूकवर ही पोस्ट लिहिली होती. टीका होताच त्याने पोस्ट डिलीट देखील केली. परंतु, तोपर्यंत त्याच्या पोस्टचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आणि लोकांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला.

आणखी काय म्हणाला श्रवण?

श्रवण एक तेलुगू दिग्दर्शक आहे. त्याने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिले, "सरकारने अहिंसक बलात्काराला प्रोत्साहित करायला हवे. मुलींनी बलात्कारा स्वीकारावा. उलट त्यांनी आपल्याकडे कंडोम देखील बाळगावे. 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलींना सेक्स एजुकेशनसह बलात्कार काय असतो हे देखील शिकवावे. त्यानंतरच अशा प्रकारचे कृत्य थांबतील. जसे वीरप्पनला ठार मारल्यानंतर तस्करी थांबणार नाही. ओसामा बिन लादेनला ठार केल्यानंतर दहशतवाद थांबणार नाही. तसेच निर्भया कायद्यामुळे बलात्कार आणि हिंसाचार देखील थांबणार नाहीत. मुलींनी बलात्काऱ्यांना सहकार्य करायला हवे. कारण, त्यांची शारीरिक भूक मिटवण्यासाठी ते असे करतात. एकदा त्यांची वासना संपली की ते हिंसक होऊन खून वगैरे करणार नाहीत. त्यामुळे, सरकारने बलात्काऱ्यांना घाबरवणे सोडून एखादी स्कीम तरी सुरू करावी. जेणेकरून बलात्कारानंतर हत्या होणार नाहीत."