आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांना आता गप्पू भैया सुरक्षित प्रवासाची पद्धत संहणार आहेत. रेल्वेने सर्वसामान्य लोकांना समजावण्यासाठी गप्पू भैया नावाने एक कार्टून कॅरेक्टर लॉन्च केले आहे, ज्याचे 9 वेगवेगळे अॅनिमेशन चित्रपट सीरीज तयार केली गेली आहे. चित्रपटाद्वारे विविध प्रकारच्या जोखमींपासून नागरिकांना सूचित केले जाईल.
बुधवारी रेल्वे बोर्डाने नॉर्दर्न सेंट्रल रेल्वे (एनसीआर) द्वारे लाॅन्च गप्पू भैयाची सीरीज सर्वच प्रमुख रेल्वे स्टेशनवर दाखवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान प्रवाश्यांच्या दुरक्ष करण्यामुळे अनेक घटना घडतात. रेल्वे बोर्डाने या घटना कमी कारण्यासाठीच हे कॅरेक्टर लाॅन्च केले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांची मान्यता आहे की, स्क्रीनमध्ये साधारण चित्रपटाकडे लोकांचे कदाचित लक्ष जाणार नाही पण कार्टूनकडे नक्की लक्ष जाते. हे अॅनिमेशन चित्रपट प्रमुख रेल्वे स्टेशनच्या स्क्रीनवर आणि सोशल मीडियावर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यन्त हा मॅसेज पोहोचू शकेल. सर्व अॅनिमेशन चित्रपट 57 मिनिटांचे आहेत.
प्रवासादरम्यान या गोष्टीं प्रकर्षाने टाळाव्यात...
एस्कलेटरवर उलटे चालू नये, दरवाज्याला लटकू नये.
प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींकडून खाण्यापिण्याचे सामान घेतल्याने जीव धोक्यात येऊ शकतो.
ज्वलनशील पदार्थ सोबत घेऊन चालल्याने अप्रिय घटना घडू शकतात.
सेल्फी किंवा फोटो काढण्याचे वेड जीवावर बेतू शकते.
ट्रेनच्या छतावर बसून प्रवास करू नये. विजेमुळे जीव जाऊ शकतो.
चालत्या ट्रेनमधून उतरण्याचे किंवा चढण्याचे कर्तब करू नये.
स्टेशन किंवा प्लॅटफार्मवर कोणतीही अनोळखी वस्तू उचलू नये.
रेल्वेच्या रुळावर फिरणे आणि प्लॅटफॉर्म क्रॉस करणे धोकादायक असू शकते.
फाटक नसलेली क्रॉसिंग कोणत्याच परिस्थितीत ओलांडू नये.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.